आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यश्रीसह 90\'sच्या या 10 अभिनेत्रींनी सिनेसृष्टीला ठोकला रामराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाग्यश्री - Divya Marathi
भाग्यश्री
26 वर्षांपूर्वी अर्थातच 29 डिसेंबर 1989ला रिलीज झालेला \'मैने प्यार किया\' सिनेमाने सलमान खान अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. त्यासोबत भाग्यश्रीनेदेखील या सिनेमातून पदार्पण केले होते. परंतु ती हे यश टिकवू शकली नाही. काही काळातच ती सिनेसृष्टीतून गायब झाली. 
 
90\'s च्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांनी लाखो मनांवर राज्य केले, मात्र काळानुसार लोकांना त्यांचा विसर पडला आहे. यामधील काहींचे अभिनय करिअर सुरुवातीच्या काळातच संपले तर काहींनी टॉपवर जाऊन सिनेमांना अलविदा म्हटले. या यादीत एकता सोहिनी, ममता कुलकर्णी, नगमा, मधु, रंभा, नम्रता आणि शिल्पा शिरोडकरसारख्या अभिनेत्री सामील आहेत. 
पहिल्या सिनेमानंतर लगेच भाग्यश्रीने केले लग्न- 
  
23 फेब्रुवारी 1969ला मुंबईमध्ये जन्मलेल्या भाग्यश्रीने अमोल पालेकरच्या \'कच्ची धूप\'मधून करिअरला सुरुवाती केली होती. पहिल्याच सिनेमाच्या यशानंतर तिने हिमालय दासानीसोबत संसार थाटला. लग्नानंतर तिने \'कैद में है बुलबुल\', \'त्यागी, आणि \'पायल\' हे तीन सिनेमे रिलीज झाले. 1993मध्ये रिलीज झालेल्या \'मेरा परदेशी\' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. मात्र 2001मध्ये तिने हॅलो गर्ल्स\' सिनेमातून हिंदी सिनेमांत कमबॅक केले. परंतु फ्लॉप ठरली. भाग्यश्रीला अवंतिका आणि अभिमन्यु दासानी ही दोन मुले आहेत. तिने ‘लौट आओ तृषा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या एकेकाळी सिनेसृष्टी गाजवणा-या अभिनेत्री आज आहेत अज्ञातवासात... 
बातम्या आणखी आहेत...