आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्ट्रोव्हर्शिअल सिनेमामुळे फेमस झाली ही अॅक्ट्रेस, आता सांभाळतेय 600 कोटींचा बिझनेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2003 मध्ये आलेल्या 'मातृभूमी' या वादग्रस्त सिनेमात झळकलेली अभिनेत्री म्हणजे ट्युलिप जोशी. सिनेमातील कथेनुसार, ट्लिप जोशीचे पात्र कल्कि सख्ख्या पाच भावांसोबत लग्न करते. स्त्री भ्रूण हत्येवर आधारित या सिनेमात भविष्यातील अशी स्थिती चित्रीत करण्यात आली होती, जेव्हा लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत. ट्युलिपने साकारलेली कल्किची भूमिका गाजली होती. कल्कि पाच भावांसोबत लग्न करते आणि आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भावांसोबत संबंध ठेवते. इतकेच नाही तर लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला वडिलांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले जाते.
गुजराती वडील आणि अरमेनियन आईची संतान...
11 सप्टेंबर 1979 रोजी मुबंईत ट्युलिप जन्म झाला. तिचे वडील गुजराती आणि आई अरमेनियन आहे. मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून तिने आपले शालेय आणि विवेक कॉलेजमधून मजोरिंग फूड सायन्स अँड केमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली. 2000 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मात्र या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात ती अयशस्वी ठरली. त्यानंतर तिने पाँड्स, सियाराम्स, पेप्सी आणि बीपीएल या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले.
बॉलिवूडमधील ट्युलिपची एन्ट्री...
ट्युलिपने 2002 मध्ये यशराज बॅनरच्या 'मेरे यार की शादी है' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. निर्माते आदित्य चोप्रा एका मित्राच्या लग्नात सहभागी झाले होते. तिथेच त्यांची नजर ट्युलिपवर पडली आणि त्यांनी तिला या सिनेमाच्या ऑडीशनसाठी बोलावले. सुरुवातीला ट्युलिपला हिंदी भाषा नीट बोलता येत नव्हती. यासाठी तिला फिरोज खान स्टुडिओत हिंदी भाषा शिकवण्यात आली होती. त्यानंतर 2003 मध्ये ती 'विलेन' या तेलगू आणि 'मातृभूमी' या हिंदी सिनेमात झळकली होती. मातृभूमी सिनेमा फारसा गाजला नव्हता, मात्र तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

बॉलिवूडमधील निवड सिनेमांमध्ये केले काम...
'दिल मांगे मोर' (2004), 'शून्य' (2006), 'धोखा'(2007), 'कभी कहीं' (2007), 'सुपरस्टार' (2008), 'डॅडी कूल'(2009), 'रनवे' (2009), 'होस्टल' (2010) आणि 'बी केयरफुल' (2011) या हिंदी सिनेमांमध्ये ट्युलिप झळकली आहे. याशिवाय तिने तेलगू, पंजाबी आणि कन्नड भाषेतील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे.

नव-याचा 600 कोटींचा बिझनेस सांभाळतेय ट्युलिप...
ग्लॅमरस दिसणा-या ट्युलिपने अगदी साधारण दिसणा-या कॅप्टन विनोद नायरची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. 2000 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर ट्युलिप अभिनयाकडे वळली. दिसायला सुंदर असल्यामुळे तिला जाहिराती आणि सिनेमांमध्ये काम मिळाले. सुंदर दिसणा-या ट्युलिपने लग्न मात्र अगदी साधारण दिसणा-या व्यक्तीसह लग्न केले. कॅप्टन नायरविषयी फार माहिती उपलब्ध नाहीये. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार ते एक अॅटिकेट एक्सपर्ट आहेत. ते उंचीतसुद्धा ट्युलिपपेक्षा खूप छोटे आहेत. काही ठिकाणी ते पत्नी ट्युलिपसह कॅमे-यासमोर पोज देताना दिसले आहेत. ट्युलिप आता नव-याची 600 कोटींच्या कंपनीचे काम सांभाळत असून ती कंपनीची डायरेक्टर आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्युलिपची निवडक छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...