Home »Gossip» Tulip Joshi Is Director Of Her Husband Company

फ्लॉप ठरली ही अॅक्ट्रेस, बिझनेसमनबरोबर लग्न करून सांभाळतेय कोट्यवधींची कंपनी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 12:34 PM IST

मुंबई - बॉलीवुडमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या सुरुवातीला हिट चित्रपट दिल्यानंतरही इंडस्ट्रीत फार दिवस टिकू शकल्या नाहीत. त्यापैकीच एक नाव म्हणजे ट्युलिप जोशी. 11 सप्टेंबर 1979 ला मुंबईच्या एका गुजराती कुटुंबामध्ये (वडील गुजराती आणि आई अर्मेनियम) जन्मलेल्या ट्युलिपने 2002 मध्ये यश चोप्रांच्या 'मेरे यार की शादी है' द्वारे डेब्यू केला होता. तिचा हा चित्रपट हिट ठरला. पण त्यानंतर तिला एकाही चित्रपटात यश मिळाले नाही.
कॅप्टन विनोद नायरशी प्रेमानंतर केले लग्न
चित्रपटांक काम करतानाच ट्युलिपला कॅप्टन विनोद नायरशी प्रेम झाले होते. विनोदने प्रसिद्ध नॉव्हेल'प्राइड ऑफ लॉयन्स' लिहिले आहे. दोघे सुमारे 4 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. नंतर त्यांनी लग्न केले असे म्हटले जाते. पण त्यांच्या लग्नाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.

पुढील स्लाइड्सवर कोट्यवधींची कंपनी सांभाळलेत ट्युलिप...

Next Article

Recommended