आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 टी.व्ही कलाकारांना नोटीस न देता निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवर - Divya Marathi
शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवर
मुंबई - 'भाबीजी घर पर है' या मालिकेदरम्यान अंगुरी भाबी म्हणजेच शिल्पा शिंदेला खूप लोकप्रियता लाभली. पण नंतर निर्मात्यांशी तक्रार झाल्याने शिल्पा शिंदेने शो सोडला. यानंतर शिल्पा शिंदेने मालिकेच्या निर्मात्यांवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला. ज्यावर नुकतेच FIR मालिकेची अभिनेत्री कविता कौशिकने प्रतिक्रिया देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे. 
 
कविताने म्हटले आहे की, जर शिल्पावर सेक्शुअल हॅरेसमेंट होत होती तर ती एक वर्षापर्यंत गप्प का राहिली, आणि एक वर्षानंतर याबाबत का खुलासा केला. एवढेच नव्हे तर शिल्पाने ऐनवेळी शूटींगवर येणे बंद केले होते. शिल्पाची फिस वाढविण्याची मागणी, सेटवर असताना नखरे करणे यामुळे तिचे निर्माते परेशान झाले होते. यामुळेच शिल्पाला प्रोडक्शन हाऊसने बाहेरचा रस्ता दाखविला. 
 
'गुत्थी'लाही सोडावा लागला होता कपिल शर्मा शो
सध्या कपिल-सुनीलच्या भांडणाची टी.व्ही टाऊनमध्ये चर्चा आहे पण गुत्थी च्या रोलमध्ये प्रसिद्धीस आलेला सुनील ग्रोवरलाही कपिलने याअगोदरही त्याच्या फिस वाढविण्याच्या कारणावरुन काढून टाकले होते. शो मधून बाहेर निघाल्यानंतर सुनीलने त्याचा शो 'मेड इन इंडिया' सुरु केला होता. पण तो फ्लॉप ठरला. हा शो बंद झाल्यानंतर सुनीलने कपिलच्या शोमध्ये वापसी केली. आता पुन्हा फ्लाईटमध्ये झालेल्या भांडणानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला आहे. 
 
तसे पाहिले तर सुनील आणि शिल्पा यांच्याव्यतिरीक्त असे अनेक टी.व्ही कलाकार आहेत ज्यांना कोणत्याही नोटीसीविना निर्मात्यांनी शो मधून काढून टाकले होते. 
पाहा कोणकोण आहेत हे कलाकार...
 
पाहण्यासाठी पुढच्या स्लाईडवर क्लिक करा
बातम्या आणखी आहेत...