आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen Photos: बोल्ड शूटसाठी असे सिगारेटचे झुरके घेताना दिसली ही TV अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'उतरन' या मालिकेत इच्छा हे पात्र साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री टीना दत्ता हिने अलीकडेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. यामध्ये तिचा स्टनिंग लूक बघायला मिळतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर लव इसरानी यांच्या या फोटोशूटमध्ये टीना तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करण्यासोबतच स्मोकिंग करताना दिसतेय. 

दोन लूकमध्ये झळकली टीना.. 
dainikbhaskar.com सोबत बातचीत करताना टीना म्हणाली, "फोटोग्राफर लव इसरानी यांना माझ्यावर असा काही एक्सपिरिमेंट करायचा होता, जो त्यांनी यापूर्वी कधीही केला नव्हता. मी त्यांचे काम पाहिले आणि त्यावर मी खूप इम्प्रेस झाली. मला माझे पोर्ट फोलियो करायचे होते, त्यामुळे मी लव यांची मदत घेतली. या फोटोशूटसाठी आम्ही मॅसी लूकची निवड केली. एका लूकमध्ये मी कोर्सेटसोबत शॉर्ट व्हेलव्हेट स्कर्ट परिधान केला आहे. हा लूक मला खूप आवडला. तर दुसरा मला नॅचरल लूक हवा होता. माझे फॅन्स मला या फोटोशूटमध्ये वेगळ्याच रुपात बघतील."

हातात सिगारेट  घेऊन दिल्या पोज, पण धुम्रपानाचे समर्थन करत नाही टीना.. 
काही फोटोजमध्ये टीना सिगारेट हातात घेऊन पोज देताना दिसतेय. मात्र हा फक्त फोटोशूटचा एक भाग असून खासगी आयुष्यात धुम्रपानाचे समर्थन करत नसल्याचे टीना सांगते. टीना पुढे म्हणते, "स्मोकिंग आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे मी त्याला प्रमोट करत नाहीये. पहिल्यांदाच मी सिगारेटसोबत एक्सपिरिमेंट केले आहे, जेणेकरुन केवळ फोटोज चांगले येतील. प्रत्यक्षात मी अनेक फोटोग्राफर्सना सिगारेटसोबत माझे फोटो घ्यायला लावले, पण कुणीच तयार झाले नाही. लव यांनी ही रिस्क घेतली आणि याचे रिझल्ट्स बघून मी खूप आनंदी आहे. पर्सनली मी स्मोकिंग करत नाही आणि त्याला प्रमोटदेखील करत नाही."
 
टीना दत्ताचे फोटोशूट आणि त्याचे Behind The Scenes बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर..  

फोटोज साभार- अजीत रेडेकर
 
बातम्या आणखी आहेत...