आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बजरंगी भाईजान\'ची मुन्नी, झळकली आहे अनेक मालिका आणि जाहिरातीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हर्षाली मल्होत्रा, बजरंगी भाईजानमध्ये सलमान खानसोबत, माधूरी दीक्षितसोबत ओडोनिल जाहिरातीमध्ये, यामी गौतमसोबत फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान, सोबतच एका प्रायव्हेट फंक्शनच्या तयारी करताना)
 
मुंबई- सलमान खान आणि करीना तपूर स्टारर \'बजरंगी भाईजान\' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमामध्ये दोनही स्टार्सशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. परंतु सर्वात खास भूमिका बालकलाकार हर्शाली मल्होत्राची आहे. छोट्या पडद्यावर \'कबूल है\', \'सावधान इंडिया\', \'लौट आओ तृषा\' आणि \'जोधा अकबर\'सारख्या मालिकांमध्ये झळकलेली हर्षाली पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम करत आहे. सांगितले जाते, की कबर खानला सिनेमासाठी एका गोंडस चेह-याचा शोध होता. त्यासाठी त्यांनी तब्बल 1000 मुलांचे ऑडिशन घेतले. त्यात त्यांनी हर्षालीला निवडले. 
 
पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारत आहेत हर्षाली
हर्षाली सिनेमात एका पाकिस्तानी मुलगी मुन्नीच्या पात्रात आहे. ती हरवते आणि भारतात पोहोचते. बजरंगी अर्थातच सलमान खान त्या मुलीला पाकिस्तानमध्ये अर्थातच तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी उचलतो. परंतु व्हिसा आणि पासपोर्टच्या भानगडीत अटकतो. सलमान आपली जबाबदारी पूर्ण करतो, की नाही हे जाणून घेण्यासाठी सिनेमा रिलीज होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
 
सलमान म्हणाला, \'शानदार अॅक्ट्रेस आहे हर्षाली\'
सलमान खानला ट्रेलर रिलीजदरम्यान हर्षालीविषयी विचारल्यानंतर त्याने सांगितले, \'खूप सुंदर आणि शानदार अॅक्ट्रेस आहे. परंतु सेटवर थोडेफार नखरे करते, पण लहान मुलगी आहे म्हणून चालते. मीसुध्दा बालपणी असेच नखरे करत होतो.\'
 
सिनेमाची रिअल स्टार आहे हर्षाली
करीना कपूर खानने ट्रेलर रिलीजदरम्यान हर्षालीविषयी सांगितले, \'ती अमेजिंग आहे. मला वाटते, की कबीरचा हा शोध खरंच खूप रंजक आहे. तू खूप सुंदर अॅक्ट्रेस आहे. परंतु त्यापेक्षा जास्त ती एक दीवा आहे. जर वाटले, की 2-3 तास शूटिंग थांबवावे, तर आम्ही थांबत होतो. लहान मुलांसोबत काम करणे थोडे कठिण जाते. मला वाटते, की ती सिनेमा रिअल स्टार आहे आणि सिनेमातील सर्वात महत्वाचे पात्रसुध्दा.\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हर्षालीचे काही खास फोटो...