आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 पाकिस्तानी आणि 1 चीनी अॅक्ट्रेससह हे 7 न्यूकमर 2017 मध्ये करणार बॉलिवूड डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2016 हे वर्ष बॉलिवूडसाठी संमिश्र ठरले. वर्षाच्या अखेरीस काही न्यूकमर्स बॉलिवूडमध्ये स्टार बनले.  हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेरची डेब्यू फिल्म 'मिर्जिया' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली. मात्र 'धोनी' या सिनेमातून अॅक्ट्रेस दिशा पटानी आणि 'दंगल' फेम फातिमा सना शेख बॉलिवूडवर स्वतःची वेगळी छाप उमटवण्यात यशस्वी ठरल्या. आता 2017 या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चेहरे नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावर्षी एक दोन नव्हे तर तब्बल 10 न्यूकमर्स डेब्यू करणार आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि चीनच्या अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात 2017 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करत असलेल्या 10 न्यूकमर्सवर...
 
न्यूकमर - माहिरा खान
फिल्म - रईस
न्यूकमर लिस्टमध्ये सर्वप्रथम पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या नावाचा समावेश करावा लागेल. रईस या सिनेमातून माहिरा बॉलिवूड डेब्यू करत असून हा सिनेमा येत्या 25 जानेवारी रोजी रिलीज होतोय. या सिनेमात माहिराने शाहरुख खानच्या लेडी लवची भूमिका साकारली आहे.  
 
न्यूकमर - सबा कमर
फिल्म - हिन्दी मीडियम

पाकिस्तान टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सबा कमर हीसुद्धा यावर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. सबा अभिनेता इरफान खानच्या अपोझिट 'हिन्दी मीडियम' या सिनेमात झळकणारेय. 'शादी के साइड इफेक्ट' आणि 'प्यार के साइड इफेक्ट' या सिनेमांचे दिग्दर्शक साकेत चौधरी हा सिनेमा दिग्दर्शित करणआर आहेत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी कोणते नवीन 8 चेहरे 2017 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत...  
 
बातम्या आणखी आहेत...