आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅक्ट्रेसचे इंटीमेट सीन LEAKED, प्रोड्यूसर म्हणाले-फिल्मला फायदा होत असेल तर चांगेलच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हे काही पहिल्यांदा झालेले नाही. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यातील हॉट सीन लीक होण्याची आता फॅशनच झाली असे म्हणायला हरकत नाही. यावेळी डस्की ब्यूटी राधिका आपटेच्या आगामी चित्रपटातील लव्हमेकिंग सीन लीक झाले आहेत. दुसरे असे की राधिकासोबत असे होण्याचीही ही पहिली वेळ नाही. याआधीही तिचे असले सीन लीक झालेले आहेत. यावेळी बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अजय देवगण निर्मीत चित्रपटातील दोन सीन व्हायरल झाले आहेत.

कबालीची चर्चा विरते ना विरते तर राधिकाच्या आगामी 'Parched' ची चर्चा सुरु झाली आहे. मात्र ही चर्चा कथानक किंवा तिच्या कॅरक्टरबद्दलची नाही तर, राधिकाचे न्यूड सीन इंटरनेटवर लीक झाले आहे. अजय देवगण सहनिर्माता आणि लीना यादव दिग्दर्शित 'Parched'चे दोन सीन व्हायरल झाले आहेत. यात एक राधिका सहकलाकार आदिल हूसैनसोबतचा लव्हमेकिंग सीन आहे. तर दुसऱ्या सीनमध्ये तनिष्ठा चॅटर्जी आणि राधिका आहे.
प्रोड्यूसर म्हणाले, पब्लिसिटीसाठी सीन लीक केले नाही
- 'पार्श'चे प्रोड्यूसर असीम बजाज यांना सीन लीक झाल्याची माहिती नव्हती. याची माहिती झाल्यानंतर ते म्हणाले, 'चित्रपट सध्या अमेरिका आणि फ्रान्समध्ये रिलिज झाला आहे. शक्यता आहे की कोणी तरी या सीनची क्लिप कटकरुन इंटरनेटवर लीक केली असली पाहिजे. आम्ही स्वतः असे केलेले नाही. जर यामुळे आमच्या चित्रपटाला पब्लिसिटी मिळत असेल तर चांगले आहे. यामुळे आमच्या फिल्मला फायदा होईल.'
- बजाज म्हणाले, की आम्ही लीगल अॅक्शन घेण्याची तयारी केली होती, मात्र हे कोणी केले हे आम्हाला माहित नाही.
- बजाज यांनी सांगितले की चित्रपट भारतात रिलीज करताना अॅक्ट्रेसच्या बॉडी पार्ट्सला ब्लर कले जाणार होते.

चाकोरी बाहेरचा चित्रपट
चाकोरी बाहेरचे चित्रपट करण्यासाठी राधिका प्रसिद्ध आहे. Parchedही त्याच पठडीतील चित्रपट आहे. याचा ट्रेलर जानेवारीमध्ये रिलीज झाला होता.

काय आहे चित्रपटाची कथा
मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थानची ग्रामीण पार्श्वभूमी असलेला 'Parched' स्त्री-प्रधान चित्रपट आहे. चार महिलांच्या भोवती या चित्रपटाची कथा फिरते. पुरुषप्रधान समाजात या चौघी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कसा संघर्ष करतात हे Parchedमधून दाखवण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, Parchedचे व्हायरल होत असलेले फोटो...
> चर्चा आणि गॉसिपिंगवर काय म्हणते राधिका..
> फेस्टिव्हलमध्ये कौतूकाचा वर्षाव...
> 20 कोटींचे बजेट
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...