आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 वर्षांपूर्वी असा होता मिस वर्ल्डचा लूक, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस वर्ल्ड 2017 चा किताब आपल्या नावी करणा-या मानुषी छिल्लरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत 2 वर्षांपूर्वी मानुषी कशी दिसत होती हे स्पष्ट दिसते. हा व्हिडिओ मानुषी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असतानाचा आहे.

मुळची हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 18 नोव्हेंबर रोजी मिस वर्ल्ड ठरली. तब्बल 17 वर्षांनंतर मिस वर्ल्डचा किताब भारताकडे आला आहे. यापूर्वी म्हणजे 2000 मध्ये प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड ठरली होती. मानुषी मिस वर्ल्ड ठरल्यापासून तिच्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यास लोक उत्सुक आहे. त्यातच आता तिचा दोन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ गर्ल नेशन नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 


व्हिडिओत काय म्हणाली मानुषी.... 
- व्हिडिओत मानुषी म्हणते की, ‘देशभरातून झालेल्या वैद्यकीय परीक्षेतून माझी निवड झाली. मी काही १२ तास अभ्यास करणाऱ्यांपैकी नाही. मी 12 वीमध्ये असतानाच आयईपीएमटीच्या अभ्यासाची सुरूवात केली होती. वैद्यकीय परीक्षांमध्ये सर्वात कठीण काही वाटते तर ते फिजिक्स असते, त्यामुळेच तेव्हा मी रवी सरांकडे फिजिक्सच्या क्लासला जायचे.’
- पुढे मानुषी म्हणते की, ‘मला पडलेल्या प्रश्नांचे निरसन केल्याबद्दल मी रवी सरांचे आभार मानते. परिक्षेच्या आधी कितीही पाठांतर केले तरी जर तुम्हाला त्या विषयाचा गाभा माहित नसेल तर परिक्षेला पाठांतर केल्याचा काहीच उपयोग होत नाही." 
- "एकीकडे या परिक्षेची तयारी सुरू असताना मी कॉलेजमधील इतर कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले. तुम्ही फार कष्ट घेऊन काम करण्यापेक्षा युक्तीने अभ्यास केला पाहिजे,’ असे मानुषी म्हणाली. 


पुढील स्लाईड्समध्ये बघा, मानुषीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...