आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमारच नव्हे या बॉलिवूड स्टार्सची LOVE STORY ठरली अधुरी एक कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिलीप कुमार यांची गणना बॉलिवूडच्या अशा सेलिब्रिटींमध्ये होते, ज्यांचे प्रेम अधुरे राहिले. दिलीप कुमार यांचे मधुबालावर जीवापाड प्रेम होते, पण त्यांची प्रेमकहाणी अधुरी राहिली. मधुबाला यांच्या वडिलांमुळे दोघे लग्न करु शकले नाहीत. मधुबालाच्या वडिलांना पसंत नव्हते नाते... 

दिलीप कुमार आणि मधुबाला
 अभिजात सौंदर्याचे लेणे लाभलेली मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नव्हते. मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना हे नाते पसंत नव्हते. बातम्यांनुसार, दोघांचे नाते साखरपुड्यापर्यंत पोहोचले होते. त्या काळातील इतर कलाकारांप्रमाणे या दोघांनी त्यांचे नाते कधीही लपवून ठेवले नव्हते. शिवाय कधी लपवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. 'इन्सानियत' या सिनेमाच्या प्रीमिअरदरम्यान हे दोघे हातात हात घालून एकत्र पोहोचले होते. 

असे म्हटले जाते, की मधुबालाचे वडील अताउल्लाह खान त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. त्यांनी मधुबालाला दिलीप कुमार यांच्याबरोबर लग्नास परवानगी दिली नव्हती. तर दिलीप कुमार यांनी मधुबालासमोर प्रेम किंवा वडील यापैकी एकाची निवड करण्याची अट ठेवली होती. पण मधुबाला आपल्या वडिलांच्या विरोधात गेल्या नाही आणि दिलीप कुमार यांच्या आयुष्यातून त्या निघून गेल्या. वयाच्या 32 व्या वर्षी मधुबालाचे निधन झाले.
 
दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 'ज्वार भाटा' (1944) या सिनेमातून केली होती. पण चित्रपट गाजला नाही. 1947 साली त्यांनी 'जुगनू'मध्ये काम केले. हा सिनेा हिट ठरला आणि त्यानंतर दिलीप साहेबांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 'शहीद', 'अंदाज', 'दाग', 'दीदार', 'मधुमती', 'देवदास', 'मुसाफिर', 'नया दौर', 'आन', 'आजाद'सह अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले.  
 
पुढील स्लाईड्सवर, वाचा अशाच काही जोड्यांविषयी ज्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही... 
बातम्या आणखी आहेत...