आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS : तीन मुलांच्या वडिलांसोबत केले होते जयाप्रदांनी लग्न, दोनदा केला आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा दीर्घ काळानंतर 'किन्नरु' या मल्याळम चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पुनरागम करत आहेत. एम ए निशाद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय 'सुवर्णा सुंदरी' आणि 'सराभा' ही त्यांच्या आणखी दोन आगामी चित्रपटांची नावे आहेत.  जया प्रदा यांना राजकारणातील सशक्त स्त्री म्हणून ओळखले जाते. पण मागील वर्षी उत्तर प्रदेश चित्रपट विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरून अमर सिंह यांच्या निकटवर्तीय असलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांना अखिलेश यादव यांनी हटवले होते. 

 

 

अखिलेश यादव अॅरोगंट - जयाप्रदा

अलीकडेच हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत पार पडलेल्या तिस-या इंडीवूड फिल्म कार्निव्हलला जयाप्रदा यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांना आयकॉन ऑफ द इंडियन सिनेमा या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जयाप्रदा यांनी दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादवांना अॅरोगंट म्हटले. त्या म्हणाल्या, "पॉलिटिक्समध्ये माझी कार 100 च्या स्पीडने धावत असताना अचानक ब्रेक लागला आणि सर्वकाही थांबले." त्या पुढे म्हणाल्या, "अखिलेशने मला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर अभिनयच माझे प्रोफेशन असल्याचे मी ठरवले. मला चित्रपटांमधून कुणी बाहेर काढू शकत नाही."   

 

जयाप्रदा या ऐंशीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांची फॅन फॉलोईंगसुद्धा खूप मोठी होती. 3 एप्रिल 1962 रोजी जन्मलेल्या जया यांनी वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. जयाप्रदा यांचा आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथे झाला. 


जयाप्रदा यांच्या फिल्मी करिअरविषयी तर त्यांच्या चाहत्यांना ठाऊक आहे, मात्र त्यांचे खासगी आयुष्य कुणालाही विशेष ठाऊक नाहीये. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, जयाप्रदा यांच्या विषयीच्या खास गोष्टी... 

बातम्या आणखी आहेत...