आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरविषयी जाणून घ्या A to Z, बघा सोहळ्याची क्षणचित्रे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2017’चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला आहे. तब्बल 17 वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे. चीनमधील सान्या येथे शनिवारी मिस वर्ल्ड 2017 ही स्पर्धा रंगली. जगभरातून आलेल्या 130 सौंदर्यवतींमध्ये मिस वर्ल्डच्या मुकुटासाठी कांटे की टक्कर रंगली.  अंतिम पाचमध्ये इंग्लंड, फ्रान्स, भारत, केनिया आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी स्थान पटकावले.

 

प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तराला सर्वांनीच दाद दिली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली, "मी माझ्या आईच्या जवळ आहे. माझ्यामते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे. जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा." मानुषीच्या या उत्तरानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडात झाला. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मानुषीविषयी सर्वकाही आणि सोबतच बघा, कसा रंगला MISS WORLD 2017चा सोहळा... 

बातम्या आणखी आहेत...