आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS : शूटिंगवेळी जया बच्चन होत्या प्रेग्नेंट, सचिन यांना पैसे नव्हे मिळाला होता फ्रिज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 41 वर्षांपूर्वी एक सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला होता. या सिनेमाचे नाव होते 'शोले'. 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाच्या रिलीजला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचवर्षी हा सिनेमा पाकिस्तानात पहिल्यांदाच रिलीज करण्यात आला. रमेश सिप्पी दिग्दर्शित या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांनी अभिनय केला होता. सोबतच अमजद खान यांनी साकारलेला गब्बर आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत.
या सिनेमात हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी अविस्मरणीय भूमिका वठवल्या. म्हणूनच हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला आहे. आजची तरुणाईसुद्धा या सिनेमाला पसंतीची पावती देते.
सत्तरच्या दशकात देशभरात धूम करणा-या या सिनेमाविषयीचे काही रोचक किस्से आहेत. उदाहरणार्थ या सिनेमाच्या शूटिंगवेळी जया बच्चन प्रेग्नेंट होत्या. त्यांना पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव श्वेता आहे. त्यानंतर 'शोले' सिनेमाचा प्रीमिअरवेळी सुद्धा जया बच्चन दुस-यांदा प्रेग्नेंट राहिल्या होत्या. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांच्या पोटात होता.
या सिनेमाशी निगडीत आणखी 13 रंजक किस्से जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...