आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unknown Interesting Facts Of Lata Mangeshkar\'s Life

लता यांना जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न, जाणून घ्या आयुष्यातील रंजक Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो-लता मंगेशकर)
गानकोकिळा लता मंगेशकर 86 वर्षांच्या झाल्या आहेत. लता यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929ला मध्यप्रदेश, इंदोरमध्ये झाला. त्यांचे वजील पंडीत दीनानाथ मंगेशकर रंगमंचाचे कलाकार आणि गायक होते. लता यांना बालपणापासूनच गाण्याची आवड होती. संगीतात त्यांना पहिल्यापासूनच रुची होती.
लता यांनी वयाच्या 13व्या वर्षी पहिल्यांदा 1942मध्ये आलेल्या 'पहिली मंगळागौर' या मराठी सिनेमासाठी गाण गायले होते. हिंदी सिनेमांत त्यांची एंट्री 1947मध्ये आलेल्या 'आपकी सेवा'च्या माध्यमातून झाली. त्यांनी आतापर्यंत 30 हजारांपेक्षा जास्त गाणे गायले आहेत.
2011मध्ये लता यांनी शेवटचे 'सतरंगी पॅराशूट' गाणे गायले, तेव्हापासून त्यांनी गायनाशी थोडा दूरावा ठेवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला लजा यांच्या आयुष्याबद्दल असे काही किस्से सांगत आहे, जे क्वचितच लोकांना माहित असावेत.
Facts 1-
1962 साली लता दीदींच्या जेवणात विष कालवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर त्या तीन महिने रुग्णालयात होत्या. पोलिस तपासात हा प्रयत्न कुणी केला होता, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. याचा उल्लेख लता यांच्या जवळचे पदमा सचदेव यांनी 'Aisa Kahan Se Lauen' या पुस्तकात केला आहे. त्यानंतर लेखक मजरुह सुल्तानपूरी अनेक दिवस लता यांच्या घरी येऊन अन्नाची तपासणी करत होते. त्यानंतर लता यांना देत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या लता यांच्या खासगी आयुष्यातील काही रंजक FACTS...