आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Secret Facts को-स्टार्सच्या प्रसिद्धीला घाबरतो कपिल शर्मा, पितो प्रंचड दारू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्माचा शो ऑफ एअर होणार अशी चर्चा आहे. आता तर त्याला चॅनलने नोटीस दिल्याचेही समोर आले आहे. या मागचे कारण कपिलची सारखी बिघडणारी तब्येत आणि शोचा कमी झालेला टीआरपी हे असल्याचेही सांगितले जात आहे. पण कपिल गेल्या काही दिवसांत विविध कारणांमुळे होणाऱ्या वादांमुळे सारखा चर्चेत आहे. मग ते लाचखोरीमुळे पंतप्रधानांना केलेले ट्वीट असो की, सुनील ग्रोवरबरोबरच भांडण असो. त्यात गेल्या काही दिवसांत तब्येत ठीक नसल्याने गेल्या काही दिवसांत त्याने सलग शुटिंग रद्द केले आहे. त्यामुळेही तो चर्चेत आहे. 

..तर उध्वस्त होईल करिअर 
कपिलचा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' पासून त्याच्यासोबत असलेल्या एका सुत्राच्या मते, कपिलकडे स्टारडमचे प्रेशर आहेच पण त्याचबरोबर यशामुळे तो हवेत गेला आहे. एवढेच नाही, कपिलने लवकरच त्याचा अॅटिट्यूड बदलला नाही, तर त्याचे करिअर आणि पर्सनल लाईफ दोन्ही उध्वस्त होईल, असेही म्हटले जात आहे. 

को-स्टार्सच्या प्रसिद्धीमुळे जळतो आणि घाबरतो कपिल 
कपिल शर्माला त्याच्या को स्टार्सच्या प्रसिद्धीचीही भिती वाटते. त्यामुळेच त्याने अनेकदा सुनील ग्रोवर आणि अली असगर यांच्या स्क्रीन टाइमवर अनेकदा कैची चालवली आहे. दोघे टीव्हीवर कमी वेळ झळकावे यासाठी तो असे करायचा असे म्हटले जाते. कपिल त्यामुळेच अनेकदा शोमध्ये कोस्टार्सची खिल्लीही उडवतो. एवढेच नाही तर, तो मिनिटामध्ये नर्व्हस होतो तर लगेच एक्साइटेड आणि लगेच चिंतितही झालेला दिसतो. 

प्रचंड दारु पितो.. 
कपिल शर्मा खूप ड्रिंक करतो. त्याला लेट नाइट पार्टीज करायला खूप आवडते. कपिल सक्सेसफुल झाल्यानंतर जास्त दारु प्यायला लागला असे नाही. तर तो गेल्या दोन वर्षांपासून दारु पितो आहे. विशेष म्हणजे दारु प्यायल्यानंतर त्याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते... 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कपिलबाबतचे काही आणखी सिक्रेट फॅक्ट्स.. 
 
बातम्या आणखी आहेत...