आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day Spl: बॉलिवूडमध्ये झाली 47 वर्षे, मात्र अद्याप रिलीज झाले नाहीत बिग बींचे हे 10 सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी वयाची 74 वर्षे पूर्ण करत आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेले बिग बी यांनी बॉलिवूडमध्ये 47 वर्षे झाली आहेत. 7 नोव्हेंबर 1969 रोजी त्यांचा 'सात हिंदुस्तानी' हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित या सिनेमात बिग बींनी अनवर अली अनवर हे पात्र साकारले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
12 अपयशी सिनेमांनंतर बिग बींना दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या 'जंजीर' या सिनेमाद्वारे पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. मध्यंतरी थोडे चढउतार त्यांच्या आयुष्यात आले. मात्र आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर ते बॉलिवूडचे महानायक बनले. एवढ्या वर्षांत एकापेक्षा एक उत्कृष्ट कलाकृती देणारे बिग बी यांचे काही सिनेमे अद्याप रिलीज झालेले नाहीत. कधी एकाच स्टोरी लाइनमुळे सिनेमा बंद पडला तर कधी निर्माता-दिग्दर्शकांच्या भांडणात सिनेमा डबाबंद झाला. त्यांचा एक सिनेमा असा आहे, जो केवळ 20 प्रिंटसोबत रिलीज झाला होता. divyamarathi.com आज तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या अशाच काही रिलीज न झालेल्या सिनेमांविषयीची माहिती देत आहे.

देवा (1987)
बॉलिवूडचे शो मॅन सुभाष घई आणि अमिताभ बच्चन या जोडीचा एकही सिनेमा प्रेक्षकांसमोर आलेला नाही. खरं तर सुभाष घई यांनी बिग बींसोबत 'देवा' या सिनेमाचे शूटिंग सुरु केले होते. मात्र आठवड्याभराच्या शूटिंगनंतर सिनेमा बंद झाला. त्यानंतर सुभाष घई यांनी हा सिनेमा इतर कोणत्याही कलाकारासोबत बनवला नाही.

आलीशान (1988)
बिग बींचा आणखी एक असाच सिनेमा म्हणजे 'आलीशान'. या सिनेमाचे शूटिंगदेखील आठवड्याभरापेक्षा अधिक झाले नाही. बातम्यांनुसार, हा सिनेमा डबाबंद होताच अमिताभ बच्चन यांनी जावेद अख्तर यांच्या 'मैं आझाद हूं' या शूटिंगला सुरुवात केली होती.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, इतर 8 अनरिलिज्ड आणि केवळ 20 प्रिंट्ससोबत रिलीज झालेल्या एका सिनेमाविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...