आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे \'भाभीजी...\'मधील विभूती नारायणची मुलगी, पाहा Unseen Family Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी मरियमसह आसिफ शेख. - Divya Marathi
मुलगी मरियमसह आसिफ शेख.
मुंबई - गाजलेला टिव्ही शो 'भाबीजी घर पर हैं' मध्ये विभुती नारायण यांची भूमिका करणाऱ्या आसिफ शेख रियल लाइफमध्ये एका 24 वर्षांच्या मुलीचे आणि 21 वर्षाच्या मुलाचे वडील आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव जेबा मुलीचे नाव मरियम आणि मुलाचे नाव अलीजाह आहे.  
 
आमच्या प्रतिनिधीशी खास बातचीत करताना त्यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबाला माझ्या कामावर अभिमान आहे. ते माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या पाठिशी उभे असतात. अॅक्टर असल्याने प्रेक्षकांना चांगले काम दाखवण्याचा माझा हेतू असतो. पण माझ्या कुटुंबाला माझ्या कामाविषयी माहिती असल्याने ते कधीही काहीही तक्रार करत नाहीत. एवढे चांगले कुटुंब मिळाले हे मी माझे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले. 

मुलांबरोबर घालवतात अधिक वेळ 
आसिफ यांनी पर्सनल लाइफबाबत बोलताना सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा मी अनेक दिवसांपर्यंत मुलांपासून दूर राहायचो. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यामुळेच आता मी शुटिंग नसेल तर जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवतो. माझी मुले आता मोठी झाली असून ती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. मला त्यांचा खरंच अभिमान आहे. 

मुलांना अभिनयात रस नाही 
आसिफ यांच्या लग्नाला 25 वर्षे झाली आहेत. त्यांची पत्नी जेबा गृहिणी आहे. त्यांच्या मुलांना म्हणजे मरियम आणि अलिजाह दोघांनाही अभिनयात रस नसल्याचे ते सांगतात. मरियम एका टॅलेंट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते तर अलिजाहने नुकताच डायरेक्टर माजीद मजीदी यांच्या चित्रपटात असिस्टंट म्हणून जॉब केला. 

पुढील स्लाइजड्सवर पाहा, आसिफच्या फॅमिलीचे काही Unseen PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...