आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालपणी अतिशय गोंडस दिसायची चंकी पांडेची मुलगी, आईने शेअर केले Unseen Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे फेमस स्टारकिड्सपैकी एक आहे. अनन्या लवकरच करण जोहरच्या आगामी 'स्टूडंट्स ऑफ द इयर-2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. बातम्यांनुसार, या चित्रपटात ती अभिनेता टायगर श्रॉफच्या हीरोईनच्या भूमिकेत झळकू शकते. चित्रपटासाठी टायगरच्या नावाची घोषणा झाली आहे, पण अद्याप हीरोईनचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान अनन्याची आई भावना पांडेने तिचे काही अनसीन चाइल्डहुड फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट  केले आहेत. यामध्ये अनन्या फॅमिलीशिवाय तिच्या बेस्ट फ्रेंड्स सुहाना खान आणि सनाया कपूरसोबत दिसतेय. 

 

सलमानच्या सांगण्यावरुन अनन्याने गिरवले अभिनयाचे धडे...
- अनन्या पांडे आता 18 वर्षांची असून सध्या ती तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. अनन्याला चंकी पांडेचा जवळचा मित्र सलमान खान लाँच करणार असल्याची चर्चा होती. सलमानच्या सांगण्यावरुनच अनन्याने फिटनेस क्लास आणि अॅक्टिंग क्लास लावला होता.


शाहरुख खान आणि संजय कपूरच्या मुलींची फ्रेंड आहे अनन्या...
मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून अनन्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या दोघी अनन्याच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. या तिघीही एकाच शाळेत शिकल्या. अनन्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे या दोघींसोबतचे अनेक फोटोज बघायला मिळतात. सलमान खान अनन्याचा मेंटॉर आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शाहरुखच्या बर्थडे पार्टीत अनन्या सुहाना आणि शनायासोबत अलीबागमध्ये उपस्थित होती.


भावाच्या आहे अधिक जवळ...
अनन्या तिचा चुलत भाऊ अहान पांडेच्या अतिशय जवळ आहे. अहान हा चंकी पांडेच भाऊ चिक्की पांडे यांचा मुलगा आहे. यास्मिन कराचीवाला यांच्याकडून अनन्या फिटनेसचे ट्रेनिंग घेतेय.


जेव्हा फराह खानने अनन्याच्या फोटोवर केले होते कमेंट..
नृत्यदिग्दर्शिका फराह खानने अनन्याच्या एका फोटोवर कमेंट केल्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. चंकी पांडेच्या पत्नीने म्हणजेच भावना पांडेने अनन्याचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर कमेंट करत फराह म्हणाली होती, ‘प्लीज हिची डीएनए टेस्ट करा. चंकी पांडेची मुलगी आणि ती ही इतकी सुंदर….’ फराहने ही कमेंट केल्यामुळे सर्वप्रथम अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण, तिने ही कमेंट विनोदी अंदाजात केली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, चंकी पांडेची लाडकी लेक अनन्याचे 12 UNSEEN PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...