आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही आहे सनी देओलची खरी आई प्रकाश कौर, पाहा फॅमिली PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे सनी देओलची आई प्रकाश कौर, उजवीकडे वर - वडिलांसोबत सनी आणि खाली - सनीचे बालपणीचे छायाचित्र - Divya Marathi
डावीकडे सनी देओलची आई प्रकाश कौर, उजवीकडे वर - वडिलांसोबत सनी आणि खाली - सनीचे बालपणीचे छायाचित्र
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. 19 ऑक्टोबर 1956 रोजी लुधियाना (पंजाब) येथील सहनेवाल येथे सनीचा जन्म झाला. सनीने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सनीने साकारलेल्या सर्व भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. 'गदर', 'घातक', 'बॉर्डर' यांसारखे अनेक हिट सिनेमे सनीच्या नावी जमा आहेत.

सनीची मॅचोमॅन पर्सनॅलिटी इंडस्ट्रीत चर्चेचा विषय आहे. सनीप्रमाणेच त्याचे कुटुंबीयसुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. धर्मेंद्र यांच्यापासून ते सावत्र आई हेमा मालिनी, त्याच्या सावत्र बहिणी ईशा आणि अहाना, सख्खा भाऊ बॉबी देओल यांना सर्वजण ओळखतात. मात्र सनीची खरी आई आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर प्रकाशझोतात नसतात. सनीला दोन सख्खा बहिणीसुद्धा असून विजेता आणि अजेता (लल्ली) ही त्यांची नावे आहेत.

सनीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला देओल कुटुंबाची पाहिलेली आणि न पाहिलेली छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये पाहू शकता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...