आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाने असे केले होते 'बूम'चे शूटिंग, तुम्ही पाहिले आहेत का स्टार्सचे हे 12 Unseen Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बूम' या सिनेमाच्या सेटवर कतरिना कैफ (लाल वर्तुळात) - Divya Marathi
'बूम' या सिनेमाच्या सेटवर कतरिना कैफ (लाल वर्तुळात)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी 'बार बार देखो' या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. सिनेमातील 'काला चश्मा' या गाण्यातील कतरिनाचा लूक अतिशय आकर्षक आहे. या गाण्यात कतरिना पूर्वीपेक्षा स्लिम बॉडी अॅब्समध्ये दिसत आहे. आज कतरिना कैफच्या नावाची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. मात्र 'बूम' या सिनेमाच्या शूटिंगवेळी परिस्थिती वेगळी होती. तिला इंडस्ट्रीत फारसे कुणी ओळखत नव्हेत. आज जे अटेंशन तिला मिळते, ते त्यावेळी मिळत नव्हते. प्रसिद्ध फोटोग्राफर फौजान सांगतात, ''सिनेमात प्रसिद्ध मॉडेल्सना कास्ट करण्यात आले होते. त्यापैकी एक होती पद्मा लक्ष्मी. तिला सेटवर बरेच महत्त्व मिळायचे. तिला कॅमेरा स्पेससुद्धा अधिक मिळाली. कतरिनाकडे कुणाचे लक्षही नसायचे.''
जेव्हा फोटो क्लिक करताना कतरिना झाली अनकम्फर्टेबल
'फँटम' या सिनेमाच्या सेटवर फौजान कतरिनाचे फोटो क्लिक करायला गेले तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. फौजान म्हणाले, ''फँटम या सिनेमापर्यंत कतरिना नावाजेलली अभिनेत्री बनली. तिच्याकडे बरीच सुरक्षा व्यवस्था असते. एकेदिवशी जेव्हा मी सेटवर तिचे फोटो क्लिक करत होतो, तेव्हा क्रू मेंबरने मला फोटो काढण्यास मज्जाव केला. कारण कतरिना अनकम्फर्टेबल फिल करत होती.''
शाहरुखच्या विनम्र स्वभावामुळे झाले प्रभावित
फौजान यांनी 2000 साली शाहरुख खान स्टारर 'जोश' या सिनेमातील मेकिंग सीन्स कॅप्चर केले होते. सेटवर शाहरुखचा विनम्र स्वभाव बघून ते प्रभावित झाले होते. फौजान सांगतात, ''त्यावेळीसुद्धा शाहरुख मोठा स्टार होता. इतर स्टार्सच्या उलट त्याने आपल्या बिझी शेड्युलमधून माझ्यासाठी वेळ काढला. आणि एक्सक्लूझिव्हली माझ्यासाठी फोटो काढले. प्रोफेशन असल्यामुळे त्याने मला म्हटले, अर्धा तास तुमचा आहे. तुम्हाला जितके फोटो काढायचे तेवढे काढा. हे शूट मुंबईच्या फिल्मसिटीत झाले होते. तेथे गोव्याचा सेट उभा करण्यात आला होता. कारवर उभे राहून मी शाहरुखला पोज द्यायला सांगितले, त्याने लगेचच माझे म्हणणे ऐकले आणि मला पोज दिल्या.''

12 वर्षांचा प्रवास
2004 मध्ये रिलीज झालेल्या 'देव'पासून ते 'चमेली', 'बूम', 'मुन्नाभाई सीरिज', 'फॅशन' आणि लवकरच रिलीज होणा-या 'हेट स्टोरी 3' पर्यंत... गेल्या 12 वर्षांपासून फौजान यांचा हा प्रवास सुरु आहे. सिनेमाच्या सेटवर सर्व छायाचित्रे एकत्रित करुन त्यांनी अलीकडेच 'द सिल्व्हर स्क्रिन अँड बियॉन्ड' पुस्तक लाँच केले. divyamarathi.com शी बोलताना फौजान यांनी या यूनिक फोटोजमागे असलेल्या कतरिना कैफ, शाहरुख खान या स्टार्सशी निगडीत रंजक गोष्टीही सांगितल्या. सिनेमाच्या सेटवरील रंजक बिहाइंड द सीन्स फोटोग्राफर फौजान हुसैन यांच्या या नवीन पुस्तकात बघायला मिळतात.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, Behind the Scene Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...