आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी मुखर्जी आहे या भव्य स्टुडिओची मालकीण, पाहा Unseen Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशराज स्टुडिओची छायाचित्रे, इनसेटमध्ये राणी मुखर्जी - Divya Marathi
यशराज स्टुडिओची छायाचित्रे, इनसेटमध्ये राणी मुखर्जी

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री राणी मुखर्जीने आज (9 डिसेंबर) सकाळी गोंडस मुलीला जन्म दिला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात राणीने बाळाला जन्म दिला. राणी आणि आदित्य चोप्रा या दाम्पत्यानी आपल्या लाडक्या लेकीचे नाव 'आदिरा' असे ठेवले आहे. आदिरा हे नाव आदित्य आणि राणी या नावाचे कॉम्बिनेशन आहे. यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आणि तब्बल तीन हजार कोटींचा मालक असलेला आदित्य चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांची आदिरा हे पहिले अपत्य आहे.
राणी दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांची सून आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोप्राची पत्नी आहे. गेल्यावर्षी 24 एप्रिल रोजी परदेशात गुपचुप पद्धतीने राणी-आदित्यने लग्न केले होते. लग्नानंतर राणी मुंबईतील लॅव्हीश, भव्य आणि अद्ययावत स्टुडिओ म्हणजे यशराज स्टुडिओची मालकीण झाली. आता आदिराच्या रुपात या यशराज स्टुडिओला वारस लाभला आहे.
20 एकर परिसरात आहे यशराज स्टुडिओ
दिवंगत यश चोप्रा यांनी पाया रोवलेल्या यशराज स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. वीस एकर परिसरात हा स्टुडिओ पसरला आहे. मुंबईतील वीरा देसाई रोड (अंधेरी) वर हा स्टुडिओ उभा आहे. अनेक सिनेमा, शोजची निर्मिती या स्टुडिओत झाली आहे. एडीटींग, डबिंग, मिक्सींग अशा तांत्रिक गोष्टींपासून ते कलाकारांच्या राहण्याची उत्तम सोय या स्टुडिओत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यशराज स्टुडिओची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्मध्ये पाहा डोळे दिपवणा-या यशराज स्टुडिओची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...