आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: करिश्मा-करीनासोबत बालपणी अशी धम्माल करायचा रणबीर, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1982 रोजी रणबीरचा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे घराणे असलेल्या कपूर घराण्यात जन्म झाला. रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com आपल्या वाचकांना त्याची खास छायाचित्रे दाखवत आहे. रणबीरची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही यापूर्वी बघितली असावीत.

या छायाचित्रांमध्ये रणबीर त्याचे आईवडील, अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंहसोबत दिसत आहे. तर इतर काही छायाचित्रांमध्ये तो त्याचे आजोबा आणि बॉलिवूडचे शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राजकपूर यांच्यासोबत दिसत आहे. एका छायाचित्रात बिग बी चिमुकल्या रणबीरचे लाड करताना दिसत आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही घरापासून ते शाळेपर्यंत आणि आउटिंगवरील रणबीरची वेगवेगळ्या वयातील आणि अंदाजीतल छायाचित्रे बघाल. ही छायाचित्रे रणबीर कपूर डॉट नेटवरुन घेण्यात आली आहेत. रणबीर कपूर घराण्यातील चौथी पिढी आहे. संजय लीला भन्साळींच्या 'सावरियां' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या रणबीरने अल्पावधीतच स्टारडम प्राप्त केले. तो आज बॉलिवूडमधील मोस्ट डिमांडिंग हीरो ठरला आहे.

एखाद्या सिनेमात त्याचे असणे यशाची गॅरंटी बनले आहे. रणबीरने कमर्शिअल सिनेमांसोबतच ऑफबीट कलात्मक सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये रणबीरने अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड नावी केले आहेत. त्याच्या खात्यात अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे जमा आहेत. आता लवकरच त्याचा 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान मेन लीडमध्ये आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 28 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

रणबीरची बालपणीची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...