आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बुआ'च्या लाईफचा शॉकिंग खुलासा, 4 वर्षांपासून राहत होती पतीपासून वेगळी, होणार घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कार्यक्रमात कपिल शर्माची पिंकी बुआ ही भूमिका वठवून पॉप्युलर झालेली उपासनासिंह आणि तिचा पती नीरज भारद्वाज घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. नोव्हेंबर 2009 मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. गेल्या चार वर्षांपासून दोघे वेगवेगळे राहत होते. केवळ कायदेशीर बाबी पूर्ण करुन घटस्फोट घेण्याची प्रक्रिया शिल्लक होती.
नऊ महिन्यांपासून बंद होती बातचित
उपासना आणि नीरज वेगवेगळे राहत असले तरी दोघांमध्ये संवाद सुरु होता. दोघे ठराविक कालावधीनंतर एकमेकांशी बोलायचे. पण गेल्या 9 महिन्यांपासून बातचित खंडीत झाली होती. त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता. एवढेच नव्हे तर उपासनाने नीरजला तिच्या बर्थडे पार्टीलाही बोलवले नव्हते. दोघांनी घटस्फोटापासून दूर राहण्याचा खूप प्रयत्न केला. पण मतभेद मिटले नाहीत. कम्पेटिबिलिटी इश्यूज आणि एकमेकांपासून असलेल्या अपेक्षा यामुळे दोघांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले.
उपासना म्हणाली- नो कमेंट, नीरजने केले कबुल
सेपरेशनवर विचारले असताना उपासनाने काहीही बोलण्यास नकार दिला. पण नीरज म्हणाले, की तिच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकत नाही. आम्ही म्युचली वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. उपासनाला माझी गरज नाही. मला तिला बांधून ठेवायचे नाही. प्रोफेशन लाईफचा आमच्या खासगी आयुष्याशी काहीही संबंध नाही.
नीरज म्हणाले, की आम्ही अनेकदा सोबत काम केले. उपासना मला सीनिअर आहे. पण पॉप्युलारिटी आणि प्रोफेशन लाईफचा खासगी आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नव्हता. तसाच ईगोही नव्हता. पण आम्ही एकमेकांसाठी तयार झालेलो नाहीत.
दिवाळी झाल्यानंतर नीरज घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहेत. साथ निभाना साथिया या मालिकेतील चिरागच्या रोलसाठी नीरजला ओळखले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, उपासना आणि नीरज यांचे काही खासगी आयुष्यातील फोटो....
बातम्या आणखी आहेत...