आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, स्वतःपेक्षा 9 वर्षांनी लहान तरुणासोबत विवाह थाटणारी 'ती' सध्या काय करतेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: बॉलिवूड अॅक्ट्रेस उर्मिला मातोंडकर सध्या कुठे आहे, असा प्रश्न नक्कीच ब-याच जणांना पडला असेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतोय, ती सध्या काय करतेय. 42 वर्षीय उर्मिला लाइमलाइटपासून दूर सध्या वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतेय. आठवड्याभरापूर्वीच उर्मिलाने इन्स्टाग्राम जॉइन केले आहे. या सोशल प्लॅटफॉर्मवर येताच उर्मिलाने नव-यासोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. मार्च 2016 मध्ये उर्मिला मोहसिन अख्तर मीरसोबत विवाहबद्ध झाली. काश्मीर बेस्ड बिजनेसमन आणि मॉडेल मोहसिन उर्मिलापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे.

'रंगीला'ने बदलले करिअर....
उर्मिलाने बालकलाकार म्हणून 1980 मध्ये आलेल्या 'कलयुग' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू  केले होते. मात्र तिला ओळख मिळाली ती  'मासूम' (1983) या सिनेमातून. 1991 मध्ये आलेल्या 'नरसिम्हा' सिनेमातून उर्मिलाची लीड अॅक्ट्रेस म्हणून रुपेरी पडद्यावर एन्ट्री झाली. उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने. यानंतर तिने चमत्कार (1992), जुदाई (1997), सत्या (1998), मस्त (1999), खूबसूरत (1999), प्यार तूने क्या किया (2001) आणि भूत (2003) या गाजलेल्या सिनेमांत काम केले. 2007-14 याकाळात तिने मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये स्पेशल अपिअरन्स दिला. आता मात्र उर्मिला लाइमलाइटपासून दूर सुखी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले Latest Photos आणि सोबतच लग्नाचेही काही निवडक फोटोज...