आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीमुळे चार महिने हॉटेलमध्ये राहिली राज कपूरची पत्नी, आता दिसते अशी..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा अगोदरचा आणि आताचा लुक - Divya Marathi
अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा अगोदरचा आणि आताचा लुक
मुंबई - 60 च्या दशकातील अभिनेत्री वैजयंतीमाला यांना नुकताच मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैजयंतीमाला आता 80 वर्षाच्या झाल्या आहेत आणि बरेच वर्षापासून चित्रपटांपासून दूर आहेत. फार कमी जणांना माहित आहे, की 13 ऑगस्ट 1936 साली चेन्नई येथे जन्मलेल्या वैजयंतीमाला यांनी वयाच्या 13 व्या वर्षीच चित्रपटांमध्ये एंट्री घेतली होती. 1949 मध्ये तामिळ भाषेत आलेला चित्रपट 'Vazhkai' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
 
वैजयंती यांची आई वसुंधरा ह्या 40 च्या दशकातील तामिळ चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
 
जेव्हा वैजयंतीमालामुळे साडे चार महिने हॉटेलमध्ये राहिली होती राज कपूर यांची पत्नी..
 
वैजयंतीमाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यामुळेच वादाशीही त्यांचे कायम नाते राहिले आहे. 1961 साली 'गंगा जमुना' चित्रपटाच्या सेटवर त्यांचे दिलीप कुमार यांच्याबरोबर अफेअर होते. त्याअगोदर कामिनी कौशल आणि मधुबालासोबत दिलीप कुमार यांचे नाते होते. 60 च्या दशकात वैजयंती यांचे नाव 'शो मॅन' राज कपूर यांच्याबरोबरही जोडले. 
 
असे म्हणतात, की यांचे नाते लग्नापर्यंतही पोहोचले होते. राज कपूर यांचे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही होती. अशावेळी राज कपूर यांची पत्नी कृष्णाने  मुलांसोबत घर सोडले आणि मुंबईच्या नटरंग हॉटेलमध्ये जवळपास साडे चार महिने राहण्यास निघून गेली.
 
पुढच्या स्लाईडमध्ये वाचा, जेव्हा कमी वयात वैजयंतीमालाने घेतली बॉलिवूडमध्ये एंट्री...
बातम्या आणखी आहेत...