आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वरुण धवन अडकणार लग्नगाठीत? \'ही\' असेल त्याची नववधू!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. वरुणची बालपणीची मैत्रीण नताशा दलालला तो सध्या डेट करत आहे. नताशा इंटेरिअर डिझायनर असून दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली, तरी त्यांनी आपल्या प्रेमाला नकारलेसुद्धा नाहीये. त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीही वरुण अनेकदा नताशासोबत डिनर डेटवर आणि पार्ट्यामध्ये दिसला होता. मात्र, वरुणने नताशासोबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, या सर्व अफवा आहेत. तसेच, आम्ही अद्याप लग्नाचा विचार केला नाहीये. हा निर्णय आता घेणे जरा घाईचे ठरेल, असेही वरुण म्हणाला. ‘ढिशूम’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये नताशा दिसली होती. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, नताशा धवन कुटुंबींयांसोबत अनेकदा दिसून आली आहे. तसेच धवन कुटुंबाचीही इच्छा आहे की, वरूण-नताशाचे लवकर लग्न व्हावे.
यापूर्वी वरुणने नताशासोबत बर्थडे सेलिब्रेट केला होता. त्यापार्टीत तो नताशासोबत दिसला होता. तसेच यापूर्वी अनेकदा दोघे कॅमे-यात कैद झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वरुण-नताशाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...