आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unseen Photos: This Is How Varun Dhawan Enjoys Life Before Making Big In Bollywood

कॉलेजच्या दिवसांत असे आयुष्य जगायचा 'बद्रीनाथ', बघा Unseen Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अॅक्टर वरुण धवन स्टारर 'बद्रीनाथ की दुल्हनिया'ने या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 43.05 कोटींचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी या सिनेमाने 12.25 कोटी, शनिवारी 14.75 कोटी आणि रविवारी16.05 कोटींची कमाई केली. या सिनेमात वरुण अभिनेत्री आलिया भटचा 'बद्री' बनला आहे. 29 वर्षीय वरुण खासगी आयुष्यातसुद्धा अतिशय खट्याळ असून पडद्यावरसुद्धा तो अशाच स्वरुपाच्या भूमिका साकारणे पसंत करतो. 

वरुणला व्हायचे होते रेसलर....
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा असलेल्या वरुणने 2012 साली 'स्टूडंट ऑफ द ईयर' या सिनेमातून सिनेसृष्टीत डेब्यू केले होते. मुंबईतील एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून त्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याने ब्रिटेनच्या नॉटिंगघम ट्रेंट यूनिव्हर्सिटीतून बिजनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. एका मुलाखतीत वरुणने सांगितले होते, की त्याची रेसलर व्हायची इच्छा होती, पण त्याच्या आईवडिलांना ते पसंत नव्हते. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. 
 
'माय नेम इज खान'साठी सहायक दिग्दर्शक म्हणून केले होते काम...
बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वरुणने दिग्दर्शक करण जोहरच्या 'माय नेम इज खान' या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 'स्टूडंट ऑफ द ईयर'मधून यशस्वी पदार्पण करणा-या वरुणने 'मैं तेरा हीरो', 'बदलापुर', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'एबीसीडी 2', दिलवाले, 'ढिशूम' या हिट सिनेमांमध्ये काम केलंय.  

कॉलेज लाइफ कसे एन्जॉय करायचे वरुण धवन, फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...