आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बी टाऊनच्या या फेव्हरेट \'आई\'च्या सख्ख्या मुलांमध्येच जुंपली, जाणून घ्या हिच्याविषयी सर्वकाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची फेव्हरेट आई म्हणून प्रसिद्ध निरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरुन वाद निर्माण झाल्याचे वृत्त मुंबई मिररने प्रसिद्ध केले आहे. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. निरुपा रॉय यांचे 2004 साली निधन झाले. त्यांना योगेश आणि किरण ही दोन मुले आहेत. मुंबईतील नेपियन सी रोडवर असलेल्या घरावरुन त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये वाद सुरु असून या घराती किंमत सध्या 100 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कोर्टात हा वाद सुरु आहे.
कोण आहेत निरुपा रॉय...
1931 मध्ये गुजरातच्या वलसाड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निरुपा रॉय यांची गणना बॉलिवूडच्या संवेदनशील कलाकारांमध्ये केली जाते. आपल्या पाच दशकांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवला. त्यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले होते आणि वयाच्या 15व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, त्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, निरुपा रॉय यांच्या खासगी आयुष्य आणि करिअरविषयी आणि सोबतच कधीही तुमच्या बघण्यात न आलेली खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...