आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day: 72 वर्षांच्या झाल्या तनुजा, बिनधास्त अभिनय आणि लाइफस्टाइलने मिळवली ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री तनुजा 72 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1943ला मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील कुमारसेन समर्थ सिनेमा दिग्दर्शक होते आणि आई शोभना समर्थ अभिनेत्री. गतकाळातील प्रसिध्द अभिनेत्री नुतन तनुजा यांची बहीण आहे.
तनुजा यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकराच्या रुपात 1950मध्ये आलेल्या 'हमारी बेटी'मधून केली. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचा 'छबीली' पहिला सिनेमा होता. 1961मध्ये आलेल्या 'हमारी याद आएगी' तनुजा यांच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरला.
तनुजा यांनी 'आज और कल', ‘बहारे फिर भी आएगी’, ‘दो चोर’, ‘दो दूनी चार’, ‘घराना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘ज्वेल थीफ’, ‘जीयो और जीने दो’ आणि ‘प्रेमरोग’सारखे हिट सिनेमे केले आहेत. त्यांना दोन उत्कष्ट सहायक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2014मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टॉम बॉय तनुजा-
बालपणी तनुजा यांना आई आणि आजीचे इतके प्रेम मिळाले, की 50च्या दशकात त्यांना टॉम बॉय पुरस्कार मिळाला. त्या पार्टीमध्ये ग्लॅमरस ड्रेस परिधान करायच्या. खुलेआम सिगारेट आणि दारू पित होत्या. त्या काळातील ट्रॅडिशन अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या तनुजा बिनधास्त आयुष्य जगत. त्याचा परिणाम अनेकदा त्याच्या सिनेमांवरसुध्दा दिसत होता.
रात अकेली है...
देवानंद यांच्या 'ज्वेलथीफ' सिनेमात वैजयंती माला मुख्य अभिनेत्री होत्या. परंतु तनुजा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले 'रात अकेली है' गाणे खूप लोकप्रिय झाले. आजही लोकांच्या तोंडून हे गाणे ऐकायला मिळते.
पुन्हा नव्याने सुरुवात
मुख्य अभिनेत्री म्हणून यश न मिळाल्याने तनुजा यांनी सेकंड लीड भूमिका करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या 'प्रेम रोग'मध्ये त्या अशाच भूमिकेत होत्या. बलराज साहनी यांचा मुलगा परीक्षित साहनीच्या पहिल्या 'पवित्र पापी' सिनेमात तनुजा यांनी अविस्मरणीय अभिनय केला. त्यानंतर त्या, भाभी, मावशी आणि आई भूमिका साकारू लागल्या. त्यांनी काही मालिकांमध्येसुध्दा काम केले. 'एन ऑगस्ट रेक्विम' नावाच्या इंग्रजी सिनेमातसुध्दा तनुजा झळकल्या होत्या.
मुलगी काजोल आहे आईची सावली-
1943मध्ये बंगाली दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्यासोबत लग्नगाठीत अडकल्यानंतर तनुजा यांना दोन मुली झाल्या. काजोल आणि तनिषा. काजोल चुलबुली आणि चंचल आहे, तिच्या अभिनया तनुजा यांची झलक दिसते. 2012मध्ये रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'मध्ये त्या दिसल्या होत्या. या सिनेमात काजोलचा पती आणि तनुजा यांचा जावई अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तनुजा यांचे काही सुंदर फोटो...