आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीला मारल्यानंतर स्वतःच रडत बसली विद्या बालन..पाहा काय घडले नेमके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री विद्या बालनने नुकताच रिलीज झालेल्या 'बेगम जान' चित्रपटात बोल्ड आणि दमदार स्त्रीची भूमिका केली आहे. पण खऱ्या आयुष्यात विद्या तेवढीच हळवी आहे. या गोष्टीचा प्रत्यय बेगम जानचे शूटिंग करताना आला.
 
एका मुलाखतीत विद्याच्या बाबतीत या चित्रपटातील अभिनेत्री मिष्ठी चक्रवर्तीने सांगितले की एका सीनदरम्यान जेव्हा बेगम जानने मिष्ठीला मारले तेव्हा विद्या कितीतरी वेळ रडत होती.  
 
अभिनेत्रीला मारले अन् रडत बसली विद्या...
 
चित्रपटातील एका सीनदरम्यान विद्याला मिष्ठी चक्रवर्तीला कानाखाली मारायचे होते. मिष्ठीने सांगितले की "हा सीन शूट करताना विद्या खूप इमोशनल झाली होती. ती सांगते, " सीन शूट झाल्यानंतर विद्या माझ्याजवळ आली, मला मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागली. विद्या खूप इमोशनल झाल्या होत्या. मी त्यांना सांगितल की, मी ठीक आहे तरीही त्या नुसत्या रडत होत्या आणि माफी मागत होत्या. त्यांना असे वाटले की मी खरेच रडत आहे पण मी फक्त अॅक्टींग करत होते. हा सीन इतका इमोशनल झाला होता की सेटवरील सर्वांनाच रडू कोसळले."
 
सीनच्या रिटेकसाठी तयार नव्हती विद्या..
 
चित्रपटातील दुसरी अभिनेत्री फ्लोरा सैनीने सांगितले की, "सीनदरम्यान विद्या इतकी इमोशनल झाल्या होत्या की त्यांना रडूच थांबत नव्हते. फ्लोराने सांगितले की विद्या 'डाऊन टु अर्थ' व्यक्ती आहे. ज्याप्रकारे त्या सेटवर आमच्या सर्वांची काळजी घ्यायच्या ते फार स्पेशल होते. हे पाहून फारच छान वाटले. त्या खूर्चीवर न बसता आमच्याबरोबरच पायऱ्यांवर बसून आमच्याशी गप्पा मारत असत. चित्रपटातील एका सीनमध्ये त्यांना क्रुरता दाखवायची होती. त्यात त्यांना एका मुलीला फरफटत तिचे केस ओढायचे होते. सीन शूट झाल्यानंतर त्या फार रडू लागल्या आणि सारखे त्या मुलीची माफी मागत होत्या. जेव्हा निर्मात्यांनी रीटेक करण्यास 
सांगितले तेव्हा विद्याने स्पष्ट नकार दिला. यानंतर निर्मात्यांनी त्यांना आठवण करुन दिली की त्या बेगम जानची भूमिका करत आहेत. तेव्हा विद्याने सीन परत केला पण त्यानंतरही विद्या फार रडल्या."
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या बेगम जान विषयी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...