आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे विंदू दारासिंगची दुसरी पत्नी, पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन थाटला दुसरा संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मुलगी अमेलिया आणि पत्नी डीना उमारोवासोबत विंदू दारासिंग)
सिने आणि टीव्ही अभिनेता विंदू दारासिंगने नुकतीच आपल्या वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहे. 6 मे 1972 रोजी पंजाबमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि रुस्तम-ए-हिंद दारासिंग यांच्या घरी त्याचा जन्म झाला. 1994 मध्ये करन या सिनेमाद्वारे विंदूने फिल्मी दुनियेत पदार्पण केले. 2009 मध्ये बिग बॉस या शोचा तो विजेतासुद्धा ठरला. पुरस्काराच्या रुपात त्याला एक कोटी रुपये आणि कार मिळाली होती.
फराहपासून घटस्फोट घेऊन थाटला दुसरा संसार
विंदू दारासिंगचे पहिले लग्न अभिनेत्री फराहसोबत झाले होते. फराह आणि विंदूचा एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांत दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. फराह ही अभिनेत्री तब्बूची थोरली बहीण आहे. फराहपासून विभक्त झाल्यानंतर विंदून मॉडेल डीना उमारोवासोबत दुसरे लग्न केले. या दोघांची एक मुलगी असून अमेलिया हे तिचे नाव आहे.
सहायक अभिनेत्याच्या रुपात निर्माण केली ओळख
विंदूने आपल्या फिल्मी करिअरमध्ये सर्वाधिक सहायक भूमिका साकारल्या. गर्व, पार्टनर, हाउसफूल, हाउसफूल 2, जोकर, सन ऑफ सरदार, हिम्मतवाला या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. याशिवाय अनेक मालिकांमध्येही त्याने अभिनय केला आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी झाली होती अटक
2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये विंदूचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने त्याला अटकदेखील केली होती. बुकीजसोबत संबंध असल्याने त्याला अटक झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विंदूची कुटुंबीयांसोबतची छायाचित्रे...