आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीही व्हायरल होतात सपना चौधरीचे हे PHOTOS, हे आहे त्यामागील सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपनाच्या लग्नाचा हा फोटो असल्याचे सांगितले जाते. वास्तविक सपनाच्या अल्बममधील कट केलेला हा फोटो आहे. - Divya Marathi
सपनाच्या लग्नाचा हा फोटो असल्याचे सांगितले जाते. वास्तविक सपनाच्या अल्बममधील कट केलेला हा फोटो आहे.

मुंबई/पानीपत - 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेली सपना चौधरी आता अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सपनाला आता बॉलिवूडमधून रोल आणि डान्सच्या ऑफर येत आहेत. सपनाचे म्हणणे आहे, की बॉलिवूडमधून कितीही ऑफर आल्या आणि बॉलिवूडमध्ये कितीही काम केले तरी लाइव्ह डान्स शो कधीही सोडणार नाही, कारण आज मी जी काही आहे ती फक्त डान्स शोमुळे आहे. 

 

सपनाच्या डान्सने तिला जेवढी प्रसिद्धी मिळवून दिली आहे, तेवढेच वादही दिले आहेत. सपना चौधरीचे दरवेळेस नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि तिच्याबद्दल वाद निर्माण होतो. त्यावर अनेकदा तिला समोर येऊन स्पष्टीकरणही द्यावे लागते.

 

सपनाच्या नावाने 10 पेक्षा जास्त सोशल मीडियावर अकाऊंट 
- सपनाचे वेगवेगळे फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हायरल होत असतात. 
- एकट्या फेसबुकवर सपनाच्या नावाने 10 पेक्षा जास्त अकाऊंट आहेत. प्रत्येक अकाऊंटचा दावा आहे, की हे सपनाचे ओरिजनला फेसबुक पेज आहे. 
- या अकाऊंटवर सपनाने मात्र अद्याप कारवाई केलेली नाही. 

 

यू-ट्यूबवर सपनाच्या नावाने फेक चॅनल 
- सपनाचे डान्स व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. यामुळे यू-ट्यूबवरही तिच्या नावाने अनेक फेक चॅनल्स आहेत. 
- या चॅनलवर सपनाचे कोणासोबतचेही मॉर्फ व्हिडिओ अपलोड होत असतात. 
- काही व्हिडिओला तर हे सपनाच्या लग्नाचे व्हिडिओ असल्याचेही म्हटले गेले आहे. 
- तर काही फोटो एकत्र करुन सपना पोलिसांच्या रेडमध्ये पकडली गेली असेही दाखवण्यात आले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, डान्सर सपना चौधरीचे व्हायरल फोटो... 

बातम्या आणखी आहेत...