आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काविषयी विराट म्हणाला, 'खडकाप्रमाणे ती खंबीरपणे माझ्या बाजूने उभी राहिली'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात अनुष्का शर्माच्या अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. अनुष्कामुळे विराटच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि मुख्य म्हणजे तिच्यामुळे आयुष्यात स्थिरता आल्याचं तो सांगतो. ‘माझ्या आयुष्यात असलेल्या त्या व्यक्तीची ही जादू आहे. तिने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांत माझ्यात चांगले बदलसुद्धा झाले आहेत. शांतपणे गोष्टी कशा हाताळता येतात, आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर कसा करावा, हे सर्व तिने मला शिकवलं,’असं तो म्हणाला.

वाईट काळात अनुष्काने दिली साथ.. 
अनुष्काविषयी विराट म्हणलो, ‘प्रत्येक वेळी तिने मला प्रोत्साहित केलं. एखाद्या खडकाप्रमाणे ती खंबीरपणे माझ्या बाजूने उभी राहिली. ही गोष्ट आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण त्यावेळी दोघांवर टीकांचा भडीमार होत होता. ‘या तरुण खेळाडूंना फक्त मौजमजा करायची असते,’ अशी टीका अनेकांनी केली. मात्र, फक्त लोकांना वाटतं, की मी रिलेशनशिपमध्ये राहू नये, म्हणून मी राहू नये का? हे अर्थहीन आहे.’

पुढे वाचा, आणखी काय म्हणाला विराट.. 
बातम्या आणखी आहेत...