आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ट्युबलाइट'च्या सेटवर भाईजानने केली अशी मस्ती, समोर आला मेकिंग Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'सुलतान'नंतर सलमान खानच्या 'ट्युबलाईट' या चित्रपटाचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील सलमान खानच्या भूमिकेविषयीदेखिल सर्वांनाच उत्सुकता आहे. सलमान खानचे चित्रपट हे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असतात. त्याचप्रमाणे सलमान खानबरोबर काम करणाऱ्या कलाकारांसाठीही सलमानचे चित्रपट हे खास असतात. त्याचे कारण म्हणजे शुटिंगदरम्यान सलमान खान सेटवर भरपूर मस्ती करून वातावरण अगदी हलके फुलके ठेवत असतो.
 
ट्युबलाईटच्या सेटवरही सलमानने अशी धमाल केली आहे. नुकताच 'ट्युबलाइट'चा एक मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. त्यात सलमान आणि संपूर्ण क्रूची ही मस्ती आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.  या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि त्याच्या लहानग्या मित्राची बाँडिंगही पाहायला मिळणार आहे. ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

सलमानचे 'ट्युबलाईट'च्या सेटवरील मस्तीचे फोटोज.. पुढील स्लाइड्सवर, अखेरच्या स्लाइडवर मेकिंगचा व्हिडीओ...
 
 
बातम्या आणखी आहेत...