आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'च्या या अॅक्ट्रेसने वयाने 24 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नासोबत केले होते लिपलॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंपरा या सिनेमात राम्याने तिच्यापेक्षा वयाने 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या विनोद खन्ना यांच्यासोबत लिपलॉक सीन दिला होता... त्याचाच हा व्हिडिओ.. - Divya Marathi
परंपरा या सिनेमात राम्याने तिच्यापेक्षा वयाने 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या विनोद खन्ना यांच्यासोबत लिपलॉक सीन दिला होता... त्याचाच हा व्हिडिओ..
मुंबई - बाहुबली 2 हा सिनेमा 28 एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेत्री राम्या कृष्णन (46) हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. महाराणी शिवगामीची भूमिका साकारणारी राम्या सिनेमात प्रभास (बाहुबली आणि शिवडू) च्या आई आणि आजीच्या भूमिकेत दिसली. शिवाय राणा डग्गुबत्ती (भल्लालदेव) च्या आईचीही भूमिका तिने साकारली. 200 हून अधिक तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमांत झळकलेल्या राम्याने बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. नव्वदच्या दशकात राम्याने खलनायक, वजूद (1998), बडे मियां छोटे मियां (1998), चाहत (1996), क्रिमिनल (1994) सारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये हवे तसे यश मिळू शकले नाही. म्हणून तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमांकडे वळवला. 
 
हिंदीत राम्या यशस्वी झाली नाही, पण तिच्या बोल्ड अंदाजाची नेहमीच चर्चा झाली. स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांसोबत राम्याने पडद्यावर रोमान्स केला. यामध्ये विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या अभिनेत्यांच्या नावाचा समावेश आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात राम्या तिच्यापेक्षा वयाने 28 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमिताभ बच्चनसोबत झळकली. इतकेच नाही तर वयाने 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या विनोद खन्ना यांच्यासोबत 'परंपरा' या सिनेमात राम्याने पडद्यावर लिपलॉक सीनसुद्धा दिला. शिवाय अनिल कपूर, शाहरुख खान, गोविंदा या अभिनेत्यांसोबत राम्याने स्क्रिन शेअर केली.  

पुढील स्लाईड्सवर वाचा, स्क्रिप्ट ऐकताना झोपते राम्या.. पण... 
बातम्या आणखी आहेत...