आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: 3 वर्षे डेटींग आणि लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर सोहाने केले लग्न, पाहा Wedding Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान 39 वर्षांची झाली आहे. 4 ऑक्टोबर 1978ला जन्मलेली सोहा प्रसिध्द क्रिकेटर दिवंगत मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगा आहे. 'रंग दे बसंती', 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स', 'दिल मांगे मोर'सारख्या सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवलेल्या सोहाने 25 जानेवारीला लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि अभिनता कुणाल खेमूसोबत लग्न केले. दोघांची भेट 2009मध्ये 'ढूंढते रह जाओगे' सिनेमाच्या सेटवर झाली. तीन वर्षे डेट केल्यानंतर आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी जानेवारी 2015मध्ये लग्न केले.
 
मुंबईच्या खार स्थित मेहर अपार्टमेंटमध्ये दोघांनी साध्या पध्दतीने लग्न केले. हा खासगी समारंभ होता, यात केवळ सोहा आणि कुणालचे कुटुंबीय आणि निवडक फ्रेंड्स पोहोचले होते. यादरम्यान सोहाची आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान आणि वहीण करीना कपूर यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यांनी सोहा आणि तिच्या पतीसोबत अनेक फोटो क्लिक केले. लग्न जितक्या साध्या पध्दतीने झाले तितक्याच धूमधडाक्यात रिसेप्शन आयोजित केले होते. यावेळी अनेक सेलेब्स स्पॉट झाले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोहा-कुणालचे Wedding Photos...
बातम्या आणखी आहेत...