आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ट्विंकलसोबत लग्नास तयार नव्हता अक्षय, जाणून घ्या कसे झाले लग्न, बघा लग्नाचे PIX

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून त्याने वयाच्या पन्नाशीत पदार्पण केले आहे. अक्षयचे लग्न प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांची थोरली कन्या ट्विंकल खन्नासोबत झाले आहे. 17 जानेवारी 2001 रोजी अक्षय-ट्विंकल लग्नगाठीत अडकले होते. अक्षयने लग्नात पांढ-या रंगाची शेरवानी आणि टि्वंकलने साडी स्टाइल लाल रंगाचा लहंगा परिधान केलेला होता. अक्षयने गळ्यात नोटांची माळ घातलेली होती. लग्नात दोघांनी एकमेकांसोबत खूप डान्स केला होता.
लग्नापूर्वी अक्षय आणि ट्विंकल यांचे दीर्घकाळ अफेअर होते. असे म्हटले जाते, की अक्षयची ट्विंकलसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. मात्र ट्विंकलची आई डिंपल यांच्या दबावापुढे अक्षयला हार मानावी लागली आणि अखेर दोघांचे लग्न झाले.
दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून आरव आणि नितारा ही त्यांची नावे आहेत. लग्नानंतर अक्षय आणि ट्विंकलचे संबंध सुधारले आणि आज दोघेही आनंदी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत.
अक्षयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बघुयात त्याच्या लग्नाची निवडक छायाचित्रे...

(छायाचित्रे साभार http://www.akshay-online.net)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...