आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Photos: दोन घटस्फोटांनंतर सिद्धार्थने विद्यासोबत केले तिसरे लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता सिध्दार्थ रॉय कपूर 41 वर्षांचा झाला आहे. सिध्दार्थ बॉलिवूडचा प्रसिध्द व्यक्तींपैकी एक आहे. त्याची दुसरी ओळख म्हणजे तो अभिनेत्री विद्या बालनचा पती आहे. सहनिर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारा सिध्दार्थ आज यशस्वी निर्माता बनला आहे.
सिध्दार्थचा जन्म 2 ऑगस्ट 1974मध्ये झाला. त्याचे वडील पंजाबी तर आई माजी मिस इंडिया आहे. त्याच्या आईने बॉलिवू़डमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केले असून दोन्ही धाकटे भाऊ आदित्य रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूर अभिनेते म्हणून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. सिध्दार्थ डिज्नी इंडियाचा व्यवस्थापक दिग्दर्शक आहे. तो नेहमीच अभ्यासात पुढे आणि मेहनीत राहिला. त्याने मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर जमनलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजमधून MBAचे शिक्षण घेतले.
विद्या बालनसोबत लग्न-
सिध्दार्थचे लग्न बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालनसोबत झाले आहे. दोघांनी 14 डिसेंबर 2012मध्ये लग्न केले. सिध्दार्थ विद्यासोबत मुंबईच्या वांद्र्या स्थित ग्रीन गिफ्ट नावाच्या बंगल्यात लग्नगाठीत अडकला. लग्नाचा कार्यक्रम खूपच खासगी ठेवण्यात आला होता. विद्यासोबत लग्न करण्यापूर्वी सिध्दार्थचे गोन घटस्फोट झाले आहे. विद्या सिध्दार्थची तिसरी पत्नी आहे. पहिली पत्नी त्याची बालपणीची मैत्रीण होती आणि तिच्यापासून त्याला एक मुलगादेखील आहे. दुसरी पत्नी टीव्ही निर्माती होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिध्दार्थ-विद्याच्या लग्नाचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...