आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weight Loss Journey Of Zareen Khan From 100 To 57 Kilos

B\'Day : सिनेसृष्टीत एन्ट्री घेण्यापूर्वी 100 किलो होते जरीनचे वजन, आता दिसते स्लिम-ट्रीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जरीन खानचे पुर्वीचे आणि आत्ताचे रुप)

मुंबई - 2009 रिलीज झालेल्या 'वीर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये कतरिना कैफसारखी दिसणा-या एका तरुणीने एन्ट्री घेतली होती. लोकांनी जेव्हा या तरुणीला सिल्व्हर स्क्रिनवर पाहिले तेव्हा ती कतरिनाच नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला होता. कतरिनासारखी दिसणा-या या तरुणीचे नाव आहे जरीन खान. जरीन खान सलमानचीच निवड आहे. वीरमध्ये सलमानने जरीनला बॉलिवूडचे तिकिट दिले. खरं तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही, मात्र जरीनच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचे नामांकनसुद्धा मिळाले.
14 मे 1987 रोजी मुंबईत जन्मलेली जरीन आज आपला 28वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 22 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी जरीन अद्याप मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत आहे. हळू गतीने तिचे करिअर पुढे सरकत आहे. गेल्या सहा वर्षांत तिने केवळ पाच सिनेमांमध्ये अभिनय केला, तर दोन सिनेमांत स्पेशल अपिअरन्स दिला. पाच सिनेमांपैकी एक तामिळ आणि एक पंजाबी सिनेमात आहे.
जरीनचे सिनेमे....
वर्ष सिनेमे
2009 वीर
2011 रेडी
2012 हाउसफुल 2
2013 नान राजावागा पोगिरेन (तामिळ)
2014 जट जेम्स बॉन्ड (पंजाबी)
जरीनचे होते 100 किलो वजन
जरीनची ओळख तिचा आकर्षक लूक आहे. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जरीनेच वजन तब्बल 100 किलो होते. मात्र सलमानच्या सल्ल्यावरुन तिने आपले वजन कमी केले. आता तिचे वजन 57 किलो आहे. म्हणजेच तिने जवळजवळ 43 किलो वजन कमी केले.
तसे पाहता आपले वाढलेले वजन कमी करुन बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणारी जरीन एकमेव नाहीये, तिच्याप्रमाणेच अनेक स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपले अव्वाच्यासवा वजन कमी केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशाच स्टार्सविषयी...