मुंबई: हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्या सुरु असलेल्या वादात नवीन खुलासा झाला आहे. दोघांनी 2014मध्ये साखरपुडा केला होता. अशा माहिती कंगनाच्या एका क्लोज फ्रेंडने एका लीडिंग पब्लिकेशनला दिली आहे.
काय म्हणाली कंगनाची फ्रेंड...
- कंगनाच्या फ्रेंडच्या सांगण्यानुसार, 2014मध्ये हृतिकचे सुझानसोबत घटस्फोट झाला, त्याने कंगनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
- हृतिकने कंगनाला सिटी ऑफ लव्ह नावाने प्रसिद्ध शहर पॅरिसमध्ये प्रपोज केले.
- मात्र, फेब्रुवारी 2014मध्ये सर्वकाही बदलले. हृ़तिकने कतरिना कैफसोबत 'बँग बँग'चे शूटिंग सुरु केले आणि कंगनासोबत बोलणे बंद केले.
- यादरम्यान कंगना सुटी घालवण्यासाठी न्यूयॉर्कला गेली आणि हृतिक-कतरिना यांच्या जवळीकविषयी तिला माहिती झाले.
- 14 फेब्रुवारीला हृतिकने कंगनाला फोन केला. तेव्हा कंगनाने त्याला या अफवांविषयी सांगितले आणि त्याला म्हणाली, की तिच्यासोबत लॉयल राहा.
- कंगनाच्या सांगण्यानुसार, हृतिकला केवळ हे माहित करून घ्यायचे होते, की त्यांच्या साखरपुड्याविषयी कुणा-कुणाला माहिती आहे.
- तिने हृतिकला सांगितले, की तिच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण...
- यावर्षी जानेवारीच्या अखेर एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले होते, की तिने हृतिकमुळे 'आशिकी 3' सोडला?
- कंगनाने उत्तरात सांगितले, 'हो मीसुध्दा अशा अफवा ऐकल्या आहेत. मला नाही माहित सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटी मिळवण्यासाठी असे कृत्य का करतात. माझ्यासाठी त्या सर्व गोष्टी संपल्या आहेत. मला त्यांची पुनरावृत्ती करायची नाहीये.'
- तिच्या या वक्तव्यावर हृतिकने टि्वट केले होते, 'जितक्या महिलांसोबत मीडियाने माझे नाव जोडले आहेत, त्यापेक्षा जास्त चान्स माझा पोप डेनसोबत आहे.' - आता हृतिकने कंगनाच्या या वक्तव्यासाठी नोटिस पाठवली आहे.
- हृतिकने त्याचा वकील दीपेश मेहताकडून कंगनाला अब्रूनुकसानीची नोटिस पाठवली.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, कंगनाने या नोटिसला उत्तर देत हृतिकला 21 पानांची नोटिस पाठवली. त्यात तिने हृतिकवर धमकी दिल्याला आरोप लावला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, हृतिक आणि कंगनाच्या Love Storyविषयी...