आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERESTING : \'द एवेंजर्स\'च्या इंडियन व्हर्जनमध्ये ही असू शकेल स्टारकास्ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान, रॉबर्च डाउनी ज्युनिअर)
मुंबईः 'द एवेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन' हा हॉलिवूडपट शुक्रवारी भारतात रिलीज झाला. या सुपरहीरोचा सिनेमा बघण्यास प्रेक्षक आतुर होते. सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. 2012 मध्ये आलेल्या 'द एवेंजर्स' या सिनेमाचा 'द एवेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन' हा सिक्वेल आहे, या सिनेमात आर्यनमॅन (रॉबर्ट डाउनी जूनियर), कॅप्टन अमेरीका (क्रिस इवेंस), हल्क (मार्क रफेल्लो), ब्लॅक विडो (स्कारलेट जोहेंसन), थॉर (क्रिस हेम्सवर्थ) आणि हॉक-आई (जेरेमी रेनर) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
जरा विचार करा, जर या सुपरहीरोवर आधारित सिनेमा हिंदीत तयार झाला, तर त्याची स्टारकास्ट कशी असेल? टोनी स्टार्कच्या भूमिकेत कोणता भारतीय अभिनेता फिट बसेल आणि हल्कच्या भूमिकेत प्रेक्षक कुणाला बघणे पसंत करतील. चला तर आम्ही तुमची थोडी मदत करतो. इंडियन व्हर्जनमध्ये कोणते भारतीय कलाकार अगदी फिट बसतील, याचा शोध आम्ही घेतला आहे. तुम्हीही ठरवा, हे कलाकार सिनेमासाठी योग्य आहेत का...
जर 'द एवेंजर्स' सीरिजचे भारतीय व्हर्जन बनले, तर आर्यन मॅन (रॉबर्ट डाउनी ज्युनिअर)ची भूमिका अभिनेता शाहरुख खान नक्कीच वठवू शकतो. कारण यापूर्वी 'रा वन' या सिनेमात शाहरुखने सुपरहीरोची भूमिका वठवली आहे. त्यामुळे तो आर्यनमॅनचीही भूमिका पडद्यावर साकरु शकेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, 'द एवेंजर्स'च्या इंडियन व्हर्जनमध्ये कोणते भारतीय कलाकार झळकू शकतात...