आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा असे काय घडले,की रणबीर कपूरला तिचा 'बाबा' समजली आराध्या! ऐश्वर्याने केला खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आगामी 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणारेय. या सिनेमात ऐश्वर्याच्या प्रियकराची भूमिका साकारणा-या रणबीरला ऐश्वर्या आणि अभिषेकची लाडकी आराध्या चक्क तिचा बाबा समजली. विशेष म्हणजे या घटनेचा उलगडा खुद्द ऐश्वर्या राय बच्चन हिनेच केला.

नुकतेच एका मासिकाकरिता रणबीर आणि ऐश्वर्याने हॉट फोटोशूट केले होते. या मासिकाच्याच मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने आराध्याकडून झालेल्या गोंधळाबाबत सांगितले. ऐश्वर्या म्हणाली की, आराध्या एकदा रणबीरला बाबा समजली होती. एकदा आराध्या जोरात धावत आली आणि रणबीरला बिलगली. त्यावेळी त्याने अभिषेकप्रमाणेच जॅकेट आणि टोपी घातलेली होती. आराध्याला वाटले की ते तिचे वडील आहेत. पण जेव्हा तिने रणबीरचा चेहरा पाहिला तेव्हा ती गोंधळली. इतकेच नाही तर या दोघांचीही खूप चांगली मैत्री असल्याचेही ऐश्वर्याने सांगितले. आराध्या रणबीरला नेहमीच ‘आरके’ या नावाने हाक मारते, असेही ती म्हणाली.

'ऐ दिल है मुश्किल'च्या रिलीजला अखेर हिरवा कंदील..
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि रणबीरच्या केमिस्ट्रीविषयी चित्रपटसृष्टीत बरीच चर्चा रंगली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचा ट्रेलर आणि ‘बुल्लेया’ गाण्यातील या दोघांच्या जबरदस्त केमस्ट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सिनेमाला कडाडून विरोध होता. तसेच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना चित्रपट न दाखवण्याची धमकी दिली होती. मात्र आता हा वाद निवळला आहे. ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी आली असून 'ऐ दिल' च्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. प्रोड्यूसर्स असोसिएशनने यापुढे कोणत्याही चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना संधी देणार नसल्याचे वचन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे, 'ऐ दिल'चे दिग्दर्शक करण जोहर उपस्थित होते. आता ठरलेल्या दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, ऐश्वर्या-रणबीरच्या फोटोशूटची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...