आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभमुळे आज जिवंत आहे तबस्सुम, नाहीतर जळून झाला असता मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तबस्सुम एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे ज्यांना दूरदर्शनचा टॉक शो 'फूल खिले हैं गुलशन-गुलशन' (1972-1993) मधून प्रसिद्ध मिळाली. यावेळी तबस्सुम अनेक कलाकारांची मुलाखत घेत असे. यासाठी बरेचसे स्टार्स त्यांच्या स्टुडिओमध्ये येत असत. पण आपल्याला माहीत आहे का की आज जर तबस्सुम जिवंत आहे तर त्याचे कारण आहे अमिताभ बच्चन. हो हे खरे आहे की, एका अपघातादरम्यान जर अमिताभ नसते तर तबस्सुम यांचा जळून मृत्यू झाला असता. स्वतः तबस्सुम यांनी त्या घटनेची आठवण सांगितली आहे. 
 
2014 साली एका मुलाखतीत तबस्सुम यांनी त्यांच्या जीवनाशी निगडीत काही गोष्टी सांगितल्या..

- तबस्सुम यांनी सांगितले की, "मी 'फूल खिले हैं गुलशन-गुलशन' वेळी अमिताभ बच्चन, कल्याणजी-आनंदजी यांच्यासोबत देश आणि विदेशात प्रवास करत होतो. "
- "असाच एक शो अमिताभ यांनी मुंबईतील संमुखानंद हॉलमध्ये केला. तेव्हा माझा पाय फ्रॅक्चर होता त्यामुळे मी व्हिलचेअरवर बसून शो होस्ट करत होते."
- "यादरम्यान अचानक तेथे आग लागली आणि सर्व लोक सैरावैरा पळू लागले. मी मदतीसाठी ओरडत होते पण कोणीच ऐकले नाही. सगळेजण त्यांचा जीव वाचवण्यासाठी ओरडत होते." 
- "हे पाहून अमिताभ बच्चन यांनी मला घेतले आणि एका सुरक्षित जागी घेऊन गेले. मी आज जिवंत आहे तर ते केवळ अमिताभ बच्चन यांच्यामुळे. "
 
पुढच्या 5 स्लाईडवर जाणून घ्या, तबस्सुम यांच्या जीवनाशी निगडीत काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...