आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन्ट्रीला IPLची धून ऐकून वैतागली अनुष्का, विराटसोबतच्या लग्नाच्या प्रश्नावरुन तर पाराच चढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पीके'च्या सक्सेस पार्टीत अनुष्का शर्मा)
एन्टरटेन्मेंट डेस्कः एकीकडे क्रिकेटपटू विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतच्या आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली आहे. अनुष्कावरचे आपले प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी तो सोडत नाही. ट्विटरच नव्हे तर मीडियासमोरसुद्धा अगदी उघडपणे तो तिच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसतो. मात्र अनुष्का शर्माने अद्याप विराटविषयी आपले मौन बाळगले आहे. पूर्वी क्वचित एखाद्यावेळी ती त्याच्याविषयी बोलायचीसुद्धा. मात्र आता तर तिने त्याच्याविषयी काहीही बोलणे बंदच केले आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत 'पीके' या सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. चीनमध्ये शंभर कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केल्यानिमित्त ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत अनुष्काच्या एन्ट्रीला तेथे उपस्थित बँडवाल्यांनी आयपीएलची धून वाजवली. ती ऐकून अनुष्का चांगलीच वैतागली. नंतर मीडियाने तिला विराटसोबत कधी लग्न करणार? हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्र तिचा पाराच चढला. ती म्हणाली, जे होईल त्याची माहिती मीडियाला दिली जाईल. आता यापुढे मला याविषयी कुणीही कोणताही प्रश्न विचारु नये, अशी सक्त ताकिदच तिने मीडियाला दिली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या पार्टीत क्लिक झालेली अनुष्काची निवडक छायाचित्रे...