आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अर्जून कपूरच्या आजीने प्रेग्नेंट श्रीदेवीच्या पोटावर मारण्याचा केला होता प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्जून कपूर आज 32 वर्षाचा झाला आहे. 26 जून 1085 रोजी मुंबईत जन्मलेला अर्जून आई मोना शौरीनंतर त्याची आजी सत्ती यांच्या खूप जवळ आहे. अर्जून कपूरचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत दुसरे लग्न केले आहे यासाठी त्यांनी पहिली पत्नी मोनाला घटस्फोट दिला. मोनाने तिच्यावरील हा अन्याय शांतपणे सहन केला पण त्यांची आई आणि अर्जून कपूरची आजी सत्ती यांनी रागाच्या भरात श्रीदेवीच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न केला होता...
 
- जून 2016 साली एका वेबसाईटने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले की, 1996 साली मोना आणि बोनीमध्ये जेव्हा घटस्फोट झाला नव्हता तेव्हा श्रीदेवी बोनीच्या आयुष्यात होती. जेव्हा श्रीदेवी प्रेग्नेंट असल्याची माहिती मोना यांना मिळाली तेव्हा त्यांच्या हातात काहीच शिल्लक नव्हते. पण त्यांची आई सत्ती त्यांच्यासोबत झालेल्या या अन्यायामुळे फार नाराज होती. 
- एकदा जेव्हा बोनी कपूर आणि श्रीदेवी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॉफी पीत बसले होते तेव्हा सत्ती तिकडे पोहचल्या आणि श्रीदेवीला मारण्याचा प्रयत्न केला. 
-सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ती यांनी श्रीदेवीच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जान्हवी कपूर श्रीदेवीच्या पोटात होती. 
 
बोनीविरुद्ध सत्तीने केली होती केस
आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी सत्ती यांनी बोनी कपूरवर केस केली होती. पण आपल्या पतीला लोकांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही केस वापस घेतली. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, पतीच्या लग्नावर काय बोलल्या मोना कपूर..
बातम्या आणखी आहेत...