आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Before&After: जेव्हा कोयनासह या अॅक्ट्रेससच्या सौंदर्याला प्लास्टिक Surgery मुळे लागले ग्रहण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोयना मित्रा - Divya Marathi
कोयना मित्रा

मुंबईः 2004 मध्ये आलेल्या 'मुसाफिर' या सिनेमातील 'साकी साकी...' या आयटम नंबरने प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कोयना मित्रा अलीकडेच दिल्लीत दिसली. 'अपना सपना मनी मनी', 'एक खिलाडी एक हसीना' या सिनेमांमध्ये झळकलेल्या कोयनाने 2011 मध्ये नाकाची सर्जरी केली होती. सौंदर्यात भर घालण्यासाठी केलेल्या या सर्जरीमुळे कोयनाला फायदा नव्हे तर तोटाच झाला. या एका सर्जरीने कोयनाचे करिअरच उद्धवस्त केले. सर्जरीमुळे बिघडलेला नाकाचा आकार पुर्ववत करण्यासाठी तिने अनेकदा सर्जरी करुन घेतली. भारतात यश न आल्याने 2011 साली ती लॉस एंजिलिसला गेली होती.
जेव्हा कोयनाला डॉक्टर म्हणाले, आता केवळ प्रार्थना कर...
2013 साली एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कोयनाने सर्जरी आणि त्याच्या साइट इफेक्ट्सविषयीच्या काही गोष्टी शेअर करताना म्हटले होते, ''सर्जरीनंतर माझ्या नाकाच्या हाडाला सुज आली. डॉक्टरांनीसुद्धा हात उभे केले आणि म्हणाले, की आता केवळ देवाकडे प्रार्थना करा. त्या काळात मी स्वतःला घरात कैद करुन घेतले होते. लोकांमध्ये जाणे टाळले होते. अनेकांनी माझ्याविषयी ब-याच उलटसुलट बातम्या प्रकाशित केल्या होत्या.''
एकीकडे जिथे कंगना रनोट, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींच्या सौंदर्याला प्लास्टिक सर्जरीने चारचाँद लावले, तर दुसरीकडे काही नावे अशी आहेत, ज्यांना या सर्जरीचे साइड इफेक्ट्स सहन करावे लागले.
सर्जरीमुळे कोणकोणत्या अभिनेत्रींच्या सौंदर्याला चारचाँद नव्हे तर ग्रहण लागले, जाणून घेऊयात पुढील स्लाईड्समध्ये...