Home »Gossip» When Bollywood Celebs Became Disgraced After Rape, Scandals And MMS Case

बलात्कार, सेक्स स्कँडल, MMSसारख्या प्रकरणात बदनाम झाले हे 15 बॉलिवूड सेलेब्स

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 10:45 AM IST

मुंबईः आलिया भट आणि वरुण धवन स्टारर 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या सिनेमात अभिनेत्री श्वेता प्रसाद बसू हिनेदेखील एक महत्त्वाची भूमिका वठवली आहे. उर्मिला हे तिने साकारलेल्या पात्राचे नाव आहे. श्वेता अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या सेक्स स्कँडलमध्ये अडकल्या होत्या. 2014 मध्ये हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स परिसरातील एका हॉटेलवर धाड टाकून अभिनेत्री श्वेता बसूला रंगेहात अटक केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना येथील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाली होती. दोन महिने रेस्क्यू होममध्ये घालवल्यानंतर ती घरी परतली होती. श्वेताला हैदराबाद सेशन कोर्टाने याप्रकरणी क्लीन चिट दिली होती.

सेक्स रॅकेटमध्ये अडकल्यानंतर करण जोहरच्या सिनेमात झळकणार...
श्वेताने 'मकडी', 'इकबाल', 'वाह लाइफ हो तो ऐसी' या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सेक्स रॅकेटमध्ये अडकल्यापासून आतापर्यंत तिचा एकही सिनेमा रिलीज झाला नव्हता. 2016 मध्ये श्वेताच्या वडिलांनी ती करण जोहरच्या सिनेमातून कमबॅक करणार असल्याचे संकेत दिले होते.
तसे पाहता बॉलिवूड स्टार्स सेक्स स्कँडल, रेप आणि एमएमस प्रकरणात अडकणे ही नवीन बाब नाही. यापूर्वी अनेक सेलिब्रिटी अशा प्रकरणात अडकले आहेत.
शायनी आहुजा
15 मे 1973ला देहरादून, उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या शाइनीने 2003 मध्ये 'हजारो ख्वाहिशे ऐसी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर उत्कृष्ट पादार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने 'गँगस्टर' (2006), 'वो लम्हे' (2006), 'लाइफ इन अ मेट्रो' (2007) आणि 'भूल भुलैया' (2007) सारख्या हिट सिनेमांत काम केले. परंतु 2009मध्ये शाइनीवर बलात्काराचा आरोप लागला आणि त्याचे करिअर उध्वस्त झाले.

कुणी लावला होता आरोप...
- शायनी आहूजा याच्यावर 2009 मध्ये त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. - मोलकरणीच्या सांगण्यानुसार जेव्हा शायनीची पत्नी शहरात नव्हती, तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
- शायनी सतत या गोष्टींचा विरोध करत राहिला परंतू DNA चाचणीत बलात्कार केल्याचे सिद्ध झाले.
- यानंतर त्याला तुरूंगची हवादेखील खावी लागली होती. या आरोपानंतर शायनीचे बॉलिवूडमधले करिअर संपुष्टात आले.
- बलात्काराच्या प्रकरणात त्याला 27 एप्रिल 2011 रोजी न्यायालयाने त्याला जामीन दिला आणि 4 मे रोजी तुरूंगातून सोडून दिले होते.

अद्याप होऊ शकले नाही यशस्वी कमबॅक...
- बलात्कारच्या आरोपानंतर शाइनीचा 'घोस्ट' सिनेमा 2012मध्ये रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर 2015मध्ये 'वेलकम बॅक' सिनेमात त्याने कॅमियो रोल केला होता. हा सिनेमा हिट ठरला परंतु शायनीला याचा जराही फायदा झाला नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी जे बलात्कार, सेक्स स्कँडल, एमएमएसमुळे बदनाम झाले...

Next Article

Recommended