आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शेजारी बसूनही जेआरडी टाटा आणि दिलीप कुमार यांनी ओळखले नाही एकमेकांना, अशी होती पहिली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध बिझनेसमन जेआरडी टाटा यांची 29 जुलै रोजी 113 वी बर्थ अॅनिवर्सरी होती. टाटा हे त्यांच्या साध्या वागणुकीमुळे ओळखले जायचे पण आज त्यांचा असा एक किस्सा सांगणार आहोत ज्यावरुन कळेल की इतकी मोठी व्यक्ती असूनसुद्धा ते किती नम्र होते. हा तेव्हाचा काळ होता जेव्हा दिलीप कुमार त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होते तर जेआरडी टाटा प्रसिद्ध बिझनेसमन होते. एका प्रवासादरम्यान झाली होती दोघांची भेट...

दिलीप कुमार इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय चेहरा होता. गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा दिलीप कुमार एका विमान प्रवासात होते. दिलीप कुमार यांना पाहून विमानातील सर्व लोक वेडे झाले. ते त्यांच्याबरोबर फोटो काढत होते तर कोणी त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेत होते. पण त्यांच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तिला याचा काही फरक पडत नव्हता. तो व्यक्ती खिडकीबाहेर बघण्यात आणि मासिक वाचण्यात बिझी होते. ते दुसरे कोणी नाही तर बिझनेसमन जेआरडी टाटा होते. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, या घटनेबद्दल तपशीलवार..
बातम्या आणखी आहेत...