आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसाठी \'वेडे\' चाहते : कुणी केली आत्महत्या तर कुणाला विना पासपोर्टमुळे झाली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड 'फॅन' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक सुपरस्टार आणि त्याच्या क्रेजी फॅनवर आधारित आहे. रिअल लाइफमध्ये बी टाऊनच्या सुपरस्टार्सचे असे अनेक चाहते आहेत, जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात. आता सलमान खानचेच उदाहरण घ्या ना... रिपोर्ट्सनुसार, इंदोर (मध्यप्रदेश) येथील हीरा नगरस्थित सलमानच्या एका चाहत्याने यासाठी आत्महत्या केली, कारण त्याला 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे तिकिट मिळाले नव्हते.
थिएटरमध्ये कर्मचा-यांशी केले होते या चाहत्याने भांडण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचा हा चाहता त्याचा प्रेम अवतार बघण्यासाठी खूप उत्सुक होता. मात्र थिएटरमध्ये पोहोचल्यानंतर सिनेमा हाऊसफूल असल्याने त्याला तिकिट मिळू शकले नाही. त्याने थिएटरच्या कर्मचा-यांना एका तिकिटाची सोय करुन देण्याची खूप विनंती केली. मात्र हे शक्य होऊ शकेल नाही, त्यामुळे त्याने कर्मचा-यांशी वाद घातला. अखेर निराश होऊन तो घरी पोहोचला आणि आत्महत्या केली.
जेव्हा सलमानची एक झलक बघण्यासाठी विना पासपोर्ट पाकिस्तानातून भारतात आली महिला... पुढील स्लाईड्सवर वाचा. सलमानच्या चाहत्यांचे असे आणखी काही किस्से...