आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलमच्या प्रेमात वेडा झाला होता गोविंदा, या कारणामुळे करू शकला नव्हता लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलम आणि गोविंदा. - Divya Marathi
नीलम आणि गोविंदा.
गोविंदा आणि नीलम यांनी 80 च्या दशकात त्यांचे बॉलिवूड करिअर सुरू केले होते. चित्रपटांत एकत्र काम करताना गोविंदाचे नीलमवर प्रेम जडले होते असे म्हणतात. एंटरटेनमेंट पोर्टल पिंकविलामधील एका रिपोर्टनुसार गोविंदाला नीलमबरोबर लग्न करायचे होते. पण गोविंदाच्या आईला त्याने डायरेक्टर आनंद सिंह यांची साली म्हणजे सुनिता ( गोविंदाची पत्नी) बरोबर लग्न करावे असे वाटत होते. आईचे म्हणणे गोविंदा कधीही टाळू शकत नव्हता, त्यामुळे त्याने नीलमऐवजी सुनिताशी लग्न केले. गोविंदाने कधीही नीलमवर असलेले त्याचे प्रेम व्यक्त केले नाही, किंवा ते कधी समोरही आले नाही. 

लग्नाची बातमी लपवली.. 
गोविंदाने आईच्या सांगण्यावरून सुनिताबरोबर मार्च 1987 मध्ये लग्न केले. पण ही बातमी त्याने लपवून ठेवली होती. करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्याने लग्न झाल्याचे उघड केले नाही. पण गोविंदाची मुलगी टीनाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी समोर आली. पिंकविलामधील रिपोर्टनुसार 1990 मध्ये एका मुलाखतीत तो म्हणाल होता, लग्नानंतरही तो नीलमला कधी विसरू शकला नाही. त्याने नीलमबरोबर अनेक चित्रपट केले. नीलमने केवळ त्याच्याबरोबर चित्रपट करावे असे त्याला वाटायचे.  

'इल्जाम' (1986) गोविंदाचा पहिला चित्रपट होता. त्यात नीलम त्याची कोस्टार होती. गोविंदा जेव्हा पहिल्यांदा नीलमला भेटला तेव्हा तिचा साधेपणा त्याला एवढा आवडला होता की, त्याने नीलमचा पहिला चित्रपट 'जवानी' (1984) अनेक वेळा पाहिला होता. नीलमला वारंवार पाहण्यासाठी त्याने असे केले होते गोविंदा आणि नीलम ने फिल्म 'लव 86' (1986), 'खुदगर्ज' (1987), 'सिंदूर' (1987), 'हत्या' (1988), 'घराना' (1989), 'दोस्त गरीबों का' (1989), 'दो कैदी' (1989), 'फर्ज की जंग' (1989), 'बिल्लू बादशाह' (1989), 'ताकतवर' (1989), 'जोरदार' (1996) मध्ये सोबत काम केले होते. 

पुढील स्लाइड्सवर वाचा गोविंदाशी संबंधित आणखी काही बाबी... 
 
बातम्या आणखी आहेत...